चोरीप्रकरणी एकास कैदेची शिक्षा
कराड, दि. 23 (प्रतिनिधी) : चोरीप्रकरणी नितीन ऊर्फ नितेशकुमार भोलेनाथ विश्वकर्मा (रा. दाहोद-गुजरात) यास दीड वर्ष साध्या कैदेची शिक्षा सुनावण्यात आली. न्या. पी. सी. बारटक्के यांनी ही शिक्षा सुनावली.
कराड बसस्थानकानजीक असणार्या शालिमार लॉजवर 6 डिसेंबर 2015 रोजी चोरी झाली होती. नाशिक येथील सोमनाथ वसंतराव खंदारे काही कामानिमित्त 5 डिसेंबर 2015 रोजी कराडला आले होते. त्यांनी बसस्थानकानजीकच्या शालिमार लॉजमध्ये भाडेतत्वावर खोली घेतली. नितीन विश्वकर्मा हा त्याचदिवशी या लॉजमध्ये वास्तव्यास होता. दुसर्या दिवशी सकाळी सोमनाथ खंदारे आंघोळीसाठी बाथरूममध्ये गेले असताना विश्वकर्मा याने त्यांच्या खोलीत जाऊन दोन मोबाईल व वीस हजारांची रोकड चोरली. त्यानंतर तो पसार झाला. खोलीत चोरी झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर खंदारे यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी लॉजमधील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करून फेब्रुवारी 2016 मध्ये विश्वकर्मा याला ताब्यात घेऊन अटक केली. हवालदार विष्णू गार्डे यांनी या प्रकरणाचा तपास करून न्यायालयामध्ये दोषारोपपत्र सादर केले. सरकार पक्षाच्यावतीने अॅड. एस. आर. कदम यांनी काम पाहिले. त्यांना अॅड. एन. बी. गुंडे यांनी सहकार्य केले. सरकार पक्षाने केलेला युक्तिवाद व सादर केलेले पुरावे ग्राह्य मानुन न्या. बारटक्के यांनी विश्वकर्मा याला दीड वर्ष साधी कैद व दोन हजार रूपये दंड अशी शिक्षा सुनावली.