शिवसेना नगरसेविका आणि पतीवर सेना पदाधिकार्यांचा हल्ला
कल्याण, दि. 09 - कल्याण डोंबिवली महापालिकेतील नगरसेविकेवर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. शिवसेनेच्या नगरसेविका माधुरी काळे आणि त्यांचे पती प्रशांत काळे यांच्यावर हल्ला झाला आहे. विशेष म्हणजे शिवसेना पदाधिकार्यांनीच हा हल्ला केल्याचा आरोप आहे.
बुधवारी रात्री पावणेबाराच्या सुमारास माधुरी आणि प्रशांत काळे हे दाम्पत्य स्कूटरवरुन चाललं होतं. त्यावेळी धारदार हत्यारं आणि लाकडी दांडक्याच्या सहाय्याने त्यांना मारहाण करण्यात आली. मारहाणीत काळे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. शिवसेनेचे पदाधिकारी संजय गायकवाड आणि संजय मोरे यांच्या सांगण्यावरुन हल्ला झाल्याचा आरोप काळेंनी केला आहे. कल्याणच्या कोळसेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून अद्याप आरोपींना अटक झालेली नाही.