Breaking News

महिला अधिकारी, कर्मचार्‍यांचे काम अभिमानास्पद : हस्तीमल मुनोत

अहमदनगर, दि. 12 - एकविसाव्या शतकात सर्वच क्षेत्रात महिलांनी आपल्या कर्तृत्वाने यशोशिखरे गाठली आहेत. मिळालेल्या प्रत्येक संधीचे सोन्यात रूपांतर करण्याची ताकद स्त्री शक्तीमध्ये आहे. बँकींग क्षेत्रातही महिलांनी मोठी गरूडभरारी घेतली आहे. एक हजार कोटींच्या ठेवींचा टप्पा ओलांडणार्या अहमदनगर मर्चंटस् बँकेच्या वाटचालीत महिला अधिकारी व कर्मचार्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. कुटुंबाचे व्यवस्थापन यशस्वीरित्या सांभाळणार्या महिला बँकेतही तितक्याच चांगल्या पध्दतीचे व्यवस्थापन करून बँकेचे खातेदार, ठेवीदार यांना उत्कृष्ट बँकिंग सेवा देतात. महिला अधिकारी, कर्मचार्यांची कार्यक्षमता बँकेसाठी अभिमानास्पद बाब आहे, असे प्रतिपादन अहमदनगर मर्चंटस् बँकेचे संस्थापक व ज्येष्ठ संचालक हस्तीमल मुनोत यांनी केले.
जागतिक महिला दिनानिमित्त मर्चंटस् बँकेच्या तारकपूर शाखेत कार्यरत असलेल्या महिला अधिकारी व कर्मचार्यांचा मुनोत यांच्या हस्ते गुलाबपुष्प देवून  सन्मान करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास बँकेचे चेअरमन संजीव गांधी, व्हा.चेअरमन विजय कोथंबिरे, संचालिका मीनाताई मुनोत, मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश कटारिया आदी उपस्थित होते.
मुनोत पुढे म्हणाले की, मर्चंटस् बँकेने महिलांना काम करण्यास नेहमीच प्रोत्साहन देण्याची भूमिका घेतलेली आहे. तारकपूर शाखेचे संपूर्ण कामकाज महिला अधिकारी व कर्मचारी पाहतात.ग्राहकांची गरज ओळखून तारकपूर शाखेचे कामकाज सकाळी तसेच सायंकाळी चालते. याठिकाणी सर्व प्रकारच्या बँकिंग सुविधा ग्राहकांना मिळतात. महिलांनी आपल्या उत्कृष्ट कामातून बँकेच्या यशात सिंहाचा वाटा उचलला असल्याचे त्यांनी म्हटले. चेअरमन संजीव गांधी म्हणाले की, मर्चंटस् बँकेला उत्कृष्ट बँकींग सेवेची मोठी परंपरा आहे. अत्याधुनिक बँकींग सुविधा देण्यावर बँकेने नेहमीच भर दिला आहे. बँकेचे संस्थापक हस्तीमलजी मुनोत व संचालकांनी बँकेची एक तरी महिला शाखा व्हावी, असा मानस केला होता. त्यानुसार तारकपूर शाखेत महिलांना संपूर्ण कामकाजाची जबाबदारी देण्यात आली. संस्थेच्या यशात तेथिल अधिकारी, कर्मचार्यांची कार्यक्षमता महत्त्वाची असते. बँकेने महिला अधिकारी, कर्मचार्यांना नेहमीच पाठबळ दिले असून त्यांनीही स्वत:च्या कामगिरीने बँकेच्या नावलौकिकात भर टाकण्याचे काम केले आहे.  यावेळी मीनाताई मुनोत यांनीही महिला दिनानिमित्त शुभेच्छा व्यक्त केल्या. व्हा.चेअरमन कोथंबिरे यांनी आभार मानले.कार्यक्रमास बँकेतील महिला अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
मान्यवरांच्या हस्ते विविध स्पर्धेतील विजेत्यांना ट्रॉफी व प्रमाणपत्रे देण्यात आली.सांघिक करंडक एमसीए द्वितीय वर्षाच्या विध्यार्थ्यांनी पटकाविला.    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तरुण बजाज याने केले तर आभार साक्षी मध्यानने मानले. यावेळी आयएमएसचे प्राध्यापक, कर्मचारी, विध्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.