गोव्यात भाजपच्या सहा मंत्र्यांचा पराभव
पणजी, दि. 12 - उत्तरप्रदेश आणि उत्तराखंडमध्ये ऐतिहासिक विजय मिळवणार्या भाजपला गोव्यात काँग्रेसने काटे की टक्कर दिली आहे. खुद्द मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकरांसह भाजपच्या 6 मंत्र्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. गोव्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांचा मांद्रेम मतदार संघातून पराभव झाला. काँग्रेसचे उमेदवार दयानंद सोपटे यांनी पार्सेकरांचा पराभव केला.
सुभाष वेलिंगकरांच्या गोवा सुरक्षा मंचाने वेगळी चूल मांडल्यामुळे भाजपला मोठा फटका बसला. मतांच्या या ध्रुवीकरणाचा काँग्रेसला मोठा फायदा झालेला दिसत आहे. कारण मतमोजणीच्या दुसर्या टप्प्यात काँग्रेसनं मुसंडी मारली आहे. भाजपने 13 आणि काँग्रेसने 17 जागांवर विजय मिळवला आहे. गोवा सुरक्षा मंच आणि महाराष्ट्र गोमंतक पक्षाने भाजपला मदत करण्याची तयारी दर्शवल्यामुळं भाजपचं पारडं काहीसं जड आहे. शिवाय भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनीही गोव्यात भाजप सरकार स्थापन करेल, असा दावा केला आहे.