Breaking News

गोव्यात सर्वाधिक मतदारांची ’नोटा’ला पसंती

मुंबई, दि. 12 - पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये गोवा राज्य सर्वाधिक मतदान झाल्याने चर्चेत आलं होतं. पण आता मतमोजणीनंतर गोवा चर्चेत आलं आहे, ते म्हणजे सर्वाधिक मतदारांनी नोटाला पसंती दिल्यामुळे.
गोव्यातील 1.2 टक्के (10, 829) मतदारांनी नोटाला पसंती दिली आहे. म्हणजे गोव्यातील 1.2 टक्के मतदारांनी एकाही पक्षाला मतदान दिलं नाही. गोव्यानंतर  उत्तराखंडचा क्रमांक लागतो. उत्तराखंडच्या 1 टक्के (50, 408) मतदारांनी नोटाला पसंती दिली. उत्तर प्रदेश, जिथे भाजपने मुसंडी मारत ऐतिहासिक विजयाची  नोंद केली, तिथेही 0.9 (7,56,209) टक्के मतदारांनी नोटाचा पर्याय निवडला. पंजाबमध्ये 0.7 टक्के (1,08,157), तर मणिपूरमध्ये 0.5 (8,563) टक्के  मतदारांनी नोटाला मत दिलं. गोव्याच्या 40, उत्तराखंडच्या 70, मणिपूर 60, पंजाब 117 आणि उत्तर प्रदेशच्या 403 विधानसभेच्या जागांसाठी मतदान प्रक्रिया  विविध टप्प्यात पार पडली. त्याचा निकाल (शनिवार) जाहीर झाला.