शिवसेना खासदाराची एअर इंडियाच्या कर्मचार्याला चपलेने मारहाण
नवी दिल्ली, दि. 24 - शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड यांनी एअर इंडियाच्या कर्मचार्याला चपलेने मारहाण केली आहे. एअर इंडियाच्या प्रवक्त्याने ही माहिती दिली आहे.
बसण्याच्या जागेवरुन वाद झाला. त्यानंतर एअर इंडियाचा कर्मचारी आणि गायकवाड यांच्यात शाब्दिक चकमक झाली. या वादाचं रुपांतर हाणामारीमध्ये झालं. रवींद्र गायकवाड हे आज पुण्याहून दिल्लीला जात होते. त्यांचं बिझनेस क्लासचं तिकीट होतं, मात्र त्यांना इकॉनॉमिक क्लासमध्ये बसायला सांगितलं. यावरुन त्यांची क्रू मेंबर सोबत वादावादी झाली.
बिझनेस क्लासचं तिकीट असताना इकॉनॉमी क्लासमध्ये का बसवलं, याची तक्रार करण्यासाठी तक्रार बूक मागितलं. मात्र एअर इंडियाच्या कर्मचार्याने अरेरावी करत, अंगावर धावून आला. त्यामुळे मी शिवसेनेचा खासदार आहे, हे सांगून त्याला 25 वेळा सँडलने मारलं, असं शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड यांनी सांगितलं.