Breaking News

दिल्लीतील महापालिका निवडणुकीसाठी ईव्हीएम मशीनचाच वापर होणार

नवी दिल्ली, दि. 15 - दिल्लीत एप्रिलमध्ये होणा-या महापालिका निवडणुकीसाठी मतदान यंत्रांऐवजी जुन्या पद्धतीचा म्हणजे मतपत्रिकांचा वापर  करण्याची मागणी निवडणूक आयोगाकडून फेटाळण्यात आली आहे. निवडणुकीदरम्यान मतदान यंत्रांचाच  वापर केला जाईल, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले  आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पालिका निवडणुकांदरम्यानमतदान यंत्रांचा वापर केला जाऊ नये अशी मागणी करणारे पत्र निवडणूक आयोगाला  पाठवले होते. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मतदान यंत्रांमधील घोटाळ्यामुळे मोठे यश मिळाले असा आरोप उत्तर प्रदेशच्या माजी  मुख्यमंत्री मायावती यांनी केला होता. त्यानंतर
मद्रास, मुंबई व मध्य प्रदेश उच्च न्यायालयात मतदान यंत्रांच्या कथित घोटाळ्याबाबतच्या याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. त्या याचिकाकर्त्यांना आम्ही  आयोगासमोर आपले मुद्दे मांडण्यास सांगितले. मात्र मतदान यंत्रांमध्ये नेमका कोणता बिघाड आहे हे कोणालाही सांगता आले नाही. ही प्रक्रिया अधिक सक्षम  करण्यासाठी आता आम्ही व्हीव्हीपॅट मशीनचा वापरही सुरू करणार आहोत, असे निवडणुक आयोगाच्या अधिका-यांनी सांगितले.