सातारा तालुक्यातील तरुणाचा स्वाईन फ्लूने मृत्यू
सातारा, दि. 15 (प्रतिनिधी) : सातारा तालुक्यातील पाटखळ येथील दत्तात्रय ज्ञानदेव ननावरे (वय 40) यांचा स्वाईन फ्लूने मृत्यू झाल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. त्यामुळे जिल्ह्यात घबराट पसरली आहे. दरम्यान, याबाबत आरोग्य विभागाने संबंधित यंत्रणेला सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.
वातावरणात होत असलेल्या बदलामुळे विविध आजारांनी नागरिक त्रस्त आहेत. सर्दी, खोकला, ताप या आजाराचे प्रमाण वाढले आहे. जिल्ह्यात स्वाईन फ्ल्यूने पुन्हा डोके वर काढल्याची भीती व्यक्त होत आहे. पाटखळ येथील दत्तात्रय ननावरे गेल्या आठ दिवसांपासून आजारी होते. औषधोपचार करुनही त्यांच्या प्रकृतीत फरक पडत नव्हता. त्यांना श्वसनाचा अधिक त्रास जाणवायला लागल्याने शुक्रवार, दि. 10 रोजी सातार्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते.
प्रारंभी दत्तात्रय ननावरे यांना न्यूमोनिया झाल्याचे समोर आले. त्यांच्या नाक आणि घशाच्या स्त्रावाचे नमुने अधिक तपासणीसाठी खासगी प्रयोगशाळेत देण्यात आले होते. त्यामध्ये त्यांना स्वाईन फ्लू झाल्याचे निष्पन्न झाले. शनिवारी रात्री त्यांची प्रकृती आणखीच खालावली. रविवारी रात्री 10 च्या दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
दत्तात्रय ननावरे यांची परिस्थिती बेताची असून घरातील कर्त्या माणसाच्या निधनामुळे कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला. मनमिळावू स्वभावाच्या दत्तात्रय यांच्या मृत्यूने परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत आहे. दत्तात्रय ननावरे यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, बहिणी, भावजय, पत्नी, दोन मुलगे असा परिवार आहे.