Breaking News

बापूंची उणीव आम्हाला सदैव जाणवते : आ. पृथ्वीराज चव्हाण

कराड, दि. 15 (प्रतिनिधी) : कराड जनता उद्योग समुहाचे शिल्पकार स्व. विलासराव पाटील-वाठारकर यांचे सहकार क्षेत्रातील योगदान अविस्मरणीय आहे.  त्यांनी कराड जनता बँकेला लौकीक प्राप्त करुन देण्याबरोबरच जनता उद्योग समुहाची यशस्वी उभारणी करुन त्या माध्यमातून सातारा जिल्ह्यात घरोघरी या बँकेचे  नाव व सेवा पोहोचवून हजारोंचे संसार उभे केले. बापूंशी आमचे संबंध पक्ष आणि राजकारणापलीकडचे होते म्हणूनच त्यांची उणिव सदैव जाणवते, या शब्दात  माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
कराड जनता उद्योग समुहाचे शिल्पकार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष स्व. विलासराव पाटील वाठारकर यांच्या तृतीय स्मृतीदिनाचे निमित्त वाठार,  ता.कराड येथे रहिमतपूर येथील ह. भ. प. रोहिनी माने यांच्या किर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यानंतर विविध क्षेत्रातील मान्यवरांनी स्व.  बापूंना श्रध्दांजली अर्पण केली. श्रीमती नयनतारा विलासराव पाटील, राजेश पाटील, डाँ. परेश पाटील, श्रीमती राजश्री अविनाश पाटील यांच्यासह वाठारकर  कुटूंबिय याप्रसंगी उपस्थित होते.
आ. बाळासाहेब पाटील, कृष्णा कारखान्याचे माजी अध्यक्ष मदनराव मोहिते, उद्योगपती एल. सी. शहा, कराड अर्बन कुटूंबप्रमुख सुभाषराव जोशी, डाँ. सुभाषराव  एरम, समीर जोशी, दिलीपराव जाधव, सीए दिलीप गुरव, डी. सी. सी. बँकेचे सीईओ डाँ. राजेंद्र सरकाळे, सुजित शेख, निलेश कुलकर्णी, संगमचे बाळासाहेब  कुलकर्णी इंद्रजित चव्हाण, कराडचे उपनगराध्यक्ष जयवंतराव पाटील, माजी उपनगराध्यक्ष सुभाषराव पाटील, नगरसेवक इंद्रजित गुजर, सुहास पवार, राज्य  तलाठी संघाचे अध्यक्ष ज्ञानदेव डूबल, काँग्रेस नेते धैर्यशिल कदम, मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, बाजार समितीचे संचालक सुनिल पाटील, पै. आनंदराव  मोहिते, जयवंतराव साळूंखे, बंडानाना जगताप, पै. धनाजी पाटील, सर्जेराव निकम, प्रकाश पाटील, आबा मोहिते, प्रकाशबापू पाटील, जयंतकाका पाटील, प्रमोद  शिंदे, आर. टी. स्वामी, जिल्हा परिषदेेचे सदस्य शंकरराव खबाले, सौ. मंगलताई गलांडे, गणपतराव हूलवान, अशोकराव थोरात, सविनय कांबळे, पंचायत समिती  सदस्य नामदेव पाटील, दयानंद पाटील, धोंडीराम जाधव, सयाजी यादव, शंकराप्पा संसुद्दी, मोहनराव डकरे, कराड मर्चंटचे किशोर झाड, विलास यादव,  अशोकदादा पाटील, सागर पाटील, अल्ताफहुसेन मुल्ला, प्रकाश जाधव, शकील बिजापुरे, जिल्हा राष्ट्रवादी युवकचे पारिजात दळवी, अँड. दिपक थोरात, दत्तात्रय  पाटील, उदय थोरात, जयेश साळूंखे, धनंजय कदम, अरविंद खबाले, पंढरी खबाले, धिल्लन पाटील, ज्येष्ठ नेते वसंतराव पाटील कोरेगावकर, आनंदराव शिंदे,  आनंदराव सुतार, डाँ. संदीप बानुगडे, बाळकृष्ण तवटे, अधिकराव पाटील, अशोकराज चव्हाण, यासीन मुलानी, पै. नानासाहेब पाटील, पांडूरंग पाटील, वि. तु.  सुकरे गुरुजी, येरवळेचे पांडूरंग यादव, विलास यादव, अधिकराव पाटील, गंगाराम पाटील, गोटे उपसरपंच अमित पाटील, हाजी रज्जाकभाई पटेल-तंबाखूवाले,  जमीर सय्यद, वराडेचे संजय साळूंखे, सतीश मोरे, वाठारचे सरपंच विलास पाटील, सोसायटी चेअरमन ह्रदयनाथ पाटील, गंगाराम पाटील, पांडूरंग गावडे, दत्ता  देसाई यांच्यासह सर्व वाठार ग्रामस्थ उपस्थित होते. कराड जनता बँकेचे उपाध्यक्ष विकासराव धुमाळ, ज्येष्ठ संचालक शंभूशेठ लाहोटी, राजीव शहा, दिलीपभाऊ  चव्हाण, आकाराम शिंगण, रामचंद्र पाटील, दिनकर पाटील, बबनराव शिंदे, शंकरराव पाटील, प्रकाशराव तवटे, प्रा. एस. के. पाटील, रमेशराव गायकवाड, प्रा.  संजय घोक्षे, प्रा. राजेंद्र पाटोळे, अनिल पाटील, आनंदराव थोरात, अनिल यादव, डाँ. संजय जाधव, राकेश शहा, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विलासराव  सुर्यवंशी, दिपकसिंह पाटणकर, काशिनाथ चौगुले, भास्करराव जाधव, प्रविण थोरात यांच्यासह कराड जनता उद्योग समुहातील सर्व संस्थांचे संचालक, सभासद व  सेवकांनी, एंजल्स इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य चव्हाण व सर्व शिक्षक यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, नागरीकांनी वाठारकरबापूंना श्रध्दांजली वाहिली.