अवकाळी पावसामुळे मरण पावलेल्यांच्या कुटुंबियांना चार लाख रुपयांची मदत जाहीर
मुंबई, दि. 16 - कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी अवकाळी पावसामुळे मरण पावलेल्यांच्या कुटुंबियांना चार लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. मरण पावलेली व्यक्ती जर शेतकरी असेल तर दिवंगत गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेअंतर्गत त्यांना दोन लाख रुपयांपर्यंत मदत दिली जाईल असेही त्यांनी सांगितले.
मराठवाड्यातील बीड, लातूर, उस्मानाबाद, परभणी आणि नांदेड या जिल्ह्यांना बुधवारी झालेल्या अवकाळी पावसाने बीड जिल्ह्यातील पाच जणांचा वीज पडून मृत्यू झाला. लातूर, उस्मानाबादमध्ये गारांचा पाऊस झाल्याने शेतक-यांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर खोत यांनी अवकाळी पाऊस आणि गारपिटीने नुकसान झालेल्या भागांचे 24 तासात पंचनामे करण्याचे आदेशही दिले आहेत. मराठवाड्यासह सोलापूरमधील पंढरपूर,मंगळवेढा, मोहोळ, अक्कलकोट येथेही पाऊस व गारपीट झाली. यात द्राक्ष, ज्वारी, गहू, हरभरा आदी पिकांचे नुकसान झाले.