राज्य शासनातर्फे राज्यस्तरीय युवा पुरस्कार जाहीर
मुंबई, दि. 3 - राज्य शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयामार्फत देण्यात येणारे राज्यस्तरीय युवा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
राज्यातील/जिल्ह्यातील युवांनी केलेल्या समाजहिताच्या कार्याचा गौरव व्हावा, युवा विकासाचे कार्य करण्यासाठी सर्वांना प्रोत्साहित मिळावे यासाठी दरवर्षी युवा पुरस्कार देण्यात येतात.
जिल्हा युवा पुरस्कार जिल्हा स्तरावर एक युवक,एक युवती तसेच नोंदणीकृत संस्थायांना देण्यात येणार आहे. तर राज्यस्तर युवा पुरस्कारी क्रीडा विभागाचे क्षेत्रीय विभागानुसार प्रत्येक विभागातील एक युवक, एक युवतीस तसेच एक नोंदणीकृत संस्था यांना देण्यात येणार आहे.राज्य पुरस्काराचे स्वरुप गौरवपत्र, सन्मानचिन्ह, रोख पुरस्कार व्यक्तीस 50 हजार रुपये असे आहे. तर संस्थेसाठी गौरवपत्र, सन्मानचिन्ह आणि रोख पुरस्कार 1 लाख रुपये असे आहे. राज्य युवा पुरस्कार सन 2014-15 आणि 2015-16 करिता क्रीडा व युवक कल्याण मंत्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली होती. या समितीने क्रीडा विभागाच्या आठ विभागातून (मुंबई, नाशिक, पुणे, कोल्हापूर, औरंगाबाद, लातूर, नागपूर आणि अमरावती) प्रत्येकी आठ युवक, आठ युवती आणि आठ संस्थाची निवड केली आहे.