Breaking News

पिंपरी महापालिकेत राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी योगेश बहल यांची निवड

पुणे, दि. 15 -  पिंपरी-चिंचवड महापालिकेत पंधरा वर्षे सत्ता उपभोगल्यानंतर विरोधी पक्षात बसण्याची वेळ आलेल्या राष्ट्रवादीच्यागटनेतेपदी योगेश बहल यांची  निवड करण्यात आली आहे. त्यामुळे योगेश बहल हेच महापालिकेचे विरोधी पक्षनेते असणार यावर शिक्कामोर्तबझाले आहे. योगेश बहल हे महापालिका निवडणुकीत  प्रभाग क्रमांक 20, संत तुकारामनगर-महात्मा फुलेनगर-लांडेवाडी झोपडपट्टीमधून राष्ट्रवादीच्या तिकीटावरविजयी झाले आहेत. ते पाचव्यांदा नगरसेवक म्हणून  निवडून आले आहेत. यापूर्वी त्यांनी महापालिकेचे महापौरपद भूषविले आहे. तसेच ते राष्ट्रवादीकाँग्रेसचे माजी शहराध्यक्ष आहेत. महापालिकेत गेल्या 15 वर्षांपासून  राष्ट्रवादीची सत्ता होती. परंतु, नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीने महापालिकेतील सत्तागमावली आहे. मागच्या सभागृहात 84 संख्याबळ  असलेली राष्ट्रवादी आता 36 वर आली आहे.