Breaking News

बायकोशी बोलतो म्हणून तरुणाचे अपहरण करून दिले चटके

पुणे, दि. 15 - बायकोशी बोलतो म्हणून तरुणाचे अपहरण करून त्याला डोणजे परिसरात नेऊन मारहाण करण्यात आली. घरात डांबून ठेवून त्याच्या हातावर  चटके दिल्याचा प्रकार सिंहगड रोड परिसरात समोर आला आहे. या प्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी चौघांना अटक केली आहे.संतोष ज्ञानेश्‍वर बिरामणे (वय 32,  रा. आंबेगाव पठार), ज्ञानेश्‍वर शंकर बिरामणे (वय 55, रा. बिबवेवाडी), नवनाथ सुरेश नलावडे (वय 27, रा. बिबवेवाडी) आणि शेखर राजेंद्र नलावडे (वय 27,  रा. वडगाव बुद्रुक) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी नांदेडगाव येथील 26 वर्षीय तरुणाने तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार  संतोष बिरामणे आणि तक्रारदाराची ओळख आहे. पीडित तरुण रिक्षा चालवितो. तर, आरोपी हा मालट्रक चालवितो. तक्रारदाराने बिरामणे यांच्या घरी खानावळ  लावली आहे. तक्रारदार आपल्या पत्नीसोबत सतत बोलतो या संशयावरून त्यांच्यात वाद झाले.त्यामुळे बिरामणे यांनी चिडून आठ मार्चला रिक्षातून तरुणाचे  अपहरण केले. त्याला डोणजे गावाच्या अलीकडे अंधारात नेण्यात आले. तेथे शिवीगाळ करून सळईने मारहाण करण्यात आली.