Breaking News

ज्येष्ठ पत्रकार गोविंद तळवलकर यांचं अमेरिकेत निधन

मुंबई/वॉशिंग्टने, दि. 22 - ज्येष्ठ पत्रकार आणि प्रसिद्ध स्तंभलेखक गोविंद तळवलकर यांचं अमेरिकेत निधन झालं आहे. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांचं अमेरिकेत वास्तव्य होतं. मराठीसह इंग्रजी भाषेतील स्तंभलेख आणि अग्रलेखांसाठी गोविंद तळवलकर यांचं नाव प्रसिद्ध होतं.
गोविंद तळवलकर यांनी लोकसत्ताचे उपसंपादक म्हणून त्यांनी अनेक वर्षे काम केलं होतं. महाराष्ट्र टाइम्सचे संपादक म्हणून त्यांनी तब्बल 28 वर्षे काम केलं. टाइम्स ऑफ इंडिया, इलस्ट्रेटेड वीकली ऑफ इंडिया, द हिंदू, द डेक्कन हेरॉल्ड, रॅडिकल ह्युमनिस्ट, फ्रंटलाइन अशा इंग्रजी वृत्तपत्रांतून आणि साप्ताहिकांतूनही तळवलकरांनी लेखन केलं आहे. महाराष्ट्र टाइम्सला महाराष्ट्रातील एक प्रभावी, परिणामकारक दैनिक म्हणून घडविण्यात तळवलकरांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांचं बरंचसं लिखाण पुस्तकरुपानं प्रकाशित झालं आहे. गोविंद तळवलकरांच्या पत्रकारितेतील योगदानासाठी त्यांना विविध मानाच्या पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे.