Breaking News

डियन वेल्स : कार्गीओसची माघार, फेडरर उपांत्य फेरीत

इंडियन वेल्स, दि. 19 - बीएनपी परिबस इंडियन वेल्स खुल्या टेनिस स्पर्धेत ऑस्ट्रेलियाच्या निकोलस कार्गीओस याने प्रकृती अस्वास्थ्यामुळे  सामान्यातून माघार घेतली. त्यामुळे टेनिसस्टार रॉजर फेडररने स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. कार्गीओसने आधीच्या फेरीत द्वितीय मानांकित नोव्हाक  जोकोविच याचा पराभव केला होता. त्यामुळे फेडरर-कार्गीओस सामना चुरशीचा होणार, अशी खात्री क्रीडाप्रेमींना होती. मात्र, कार्गीओसच्या माघारीमुळे चाहत्यांची  निराशा झाली.