संगमनेर पंचायत समितीचे काम राज्यात आदर्शवत - आ.थोरात
अहमदनगर, दि. 15 - प्रतिकुल परिस्थितीवर मात करुन संगमनेर तालुक्याने आपला विकास साधला आहे. तालुक्याच्या विकासात अनेक सहकारी संस्थांचा मोलाचा वाटा राहिला आहे. दुष्काळ निवारण कामात मॉडेल ठरावे असे काम पंचायत समितीच्या माध्यमातून सुरु आहे. सर्व सामान्यांना विकास प्रक्रियेत सामावून घेण्यासाठी पंचायत समितीच्या माध्यमातून विविध योजना राबविल्या जात आहेत. संगमनेर पंचायत समितीचे काम रायात आदर्शवत असल्याचे गौरवउद्गार मा.महसूलमंत्री आ.बाळासाहेब थोरात यांनी काढले आहे.
संगमनेर पंचायत समितीच्या सभागृहात सभापती व उपसभापती निवडी प्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर अॅड. माधवराव कानवडे, रणजितसिंह देशमुख, बाबा ओहोळ, भाऊसाहेब कुटे, लक्ष्मणराव कुटे, मा.सभापती रावसाहेब नवले, सौ.अर्चनाताई बालोडे, जि.प सदस्य अजय फटांगरे, सिताराम राऊत , रामहरी कातोरे, मिलींद कानवडे, रमेश नेहे, अशोकराव खेमनर, निवडणूक निर्णय अधिकारी भागवत डोईफोडे, तहसीलदार साहेबराव सोनवणे, गटविकास अधिकारी सुरेश शिंदे, नायब तहसीलदार भालेराव नाना आदिंसह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी आ.थोरात म्हणाले कि, पंचायत समिती हा जिल्हा परिषद व ग्रामपंचायत यांना जोडणार महत्वपुर्ण दुवा आहे. तालुका पातळीवर पंचायत समितीच्या माध्यमातून विविध कामे केली जातात. संगमनेर पंचायत समितीच्या कामाचा आलेख सातत्याने चढता राहिला आहे. रायात आदर्शवत ठरावे असे काम या पंचायत समितीच्या माध्यमातून सुरु आहे. सर्व सामान्यांच्या विकासासाठी पंचायत समितीच्या माध्यमातून विविध योजना राबविल्या जात आहे. अगदी शेवटच्या घटकापर्यंत योजना पोहचवली जात आहे. दुष्काळी भागात अतिशय उल्लेखनीय काम पंचायत समितीच्या माध्यमातून सुरु आहे. मागील वर्षाच्या दुष्काळात पंचायत समिती व सहकारी संस्थांच्या पुढाकाराने दररोज सुमारे 280 टॅकरच्या खेपा तालुक्यात सुरु होत्या. दुष्काळ निवारण कामात त्याचा मोठा फायदा झाला. ग्रामीण भागाच्या विकासासाठी केंद्र व राय सरकारच्या अनेक योजना आहेत. त्याचा फायदा समाजातील वंचित घटकांना मिळून देण्यासाठी पंचायत समितीचे अधिकारी व कर्मचार्यांनी सातत्याने काम करावे. जिल्हा परिषद सदस्यांनी आगामी काळात पाणी या प्रश्नावर सातत्याने लक्ष ठेवून तालुक्यातील प्रत्येक गावातील पाणी पुरवठा योजनांचा अभ्यास करुन हा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करावे. जे प्रश्न प्रलंबीत असतील ते सोडविण्यासाठी राय पातळीवरुन प्रयत्न करु. पुढील काळातही अधिक चांगले काम कसे करता येईल याकडे नवनिर्वाचित सभापती, उपसभापती व कर्मचार्यांनी लक्ष द्यावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. यावेळी नवनिर्वाचीत सभापती सौ.निशाताई कोकणे व उपसभापती नवनाथ अरगडे यांचा आ.थोरात यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी नविर्वाचित सभापती सौ. निशा कोकणे म्हणाल्या कि, आ.बाळासाहेब थोरात यांचे मार्गदर्शनाखाली पंचायत समितीच्या माध्यमातून सर्व सामान्यांसाठी काम करु. प्रलंबीत असलेले प्रश्न आ.बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून सोडविण्यासाठी सदैव कटीबद्ध राहू अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
यावेळी उपसभापती नवनाथ अरगडे म्हणाले कि, आज सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांचा पुण्यस्मरण दिन आहे. याचदिवशी पंचायत समितीचा उपसभापती म्हणून काम करण्याची आ. बाळासाहेब थोरात यांनी संधी दिली. आजचा आंनदोत्सव स्व. भाऊसाहेब थोरात यांना समर्पित करतो असे सांगत तालुक्यातील सर्व सामान्य माणसांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी सतत पाठपुरावा करु असेही ते म्हणाले.
यावेळी मा. सभापती रावसाहेब नवले यांनी आपल्या कार्यकाळात केलेल्या कामांची माहिती उपस्थितांना देवून नवनिर्वाचीत सभापती , उपसभापती यांना शुभेच्छा दिल्या. मागील दुष्काळात पंचायत समितीच्या माध्यमातून चांगले काम करणारे गटविकास अधिकारी सुरेश शिंदे यांचा आ. थोरात यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अशोक हजारे यांनी केले तर आभार सौ.अर्चनाताई बालोडे यांनी मानले. यावेळी पंचायत समितीचे अधिकारी, कर्मचारी, नागरिक, युवक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.