धर्मनिरपेक्षता म्हणजे काय रे भाऊ...?
दि. 22, मार्च - काँग्रेस संस्कृती आणि पुरोगामी प्रवृत्तींनी धर्मनिरपेक्षतेला सोयीस्कर चौकटीत बंदीस्त केल्याने धर्मनिरपेक्षवाद बदनाम तर झालाच शिवाय ज्यांच्या नावावर हा धर्मनिरपेक्ष वाद खपविला तेही लक्ष्य बनले.थोडक्यात धर्मनिरपेक्षतेच्या बुरख्याआड या मंडळींनी गेली सत्तर वर्ष खेळवून सत्तेचा उपभोग घेतला.नेमकी याच बेगडी धर्मनिरपेक्षकतेला आव्हान देत बुरखा फाडणारे नरेंद्र मोदी यांना कडवे हिंदूत्व वादी संबोधून धर्मांध ठरविण्याचा केविलवाणा प्रयत्न झाला.माञ वास्तव जास्त काळ लपविता येत नाही.गेल्या तीन वर्षात समोर आलेल्या वेगवेगळ्या बाबींनी खरे धर्मनिरपेक्ष कोण हे दाखवून दिले आहे.भारत धर्मनिरपेक्षराष्ट्र आहे.या धर्मनिरपेक्षतेला छेद देण्याचे षडयंञ काही जातीयवादी मंडळी करीत आहेत.असा आरोप गेली सत्तर वर्ष देश ऐकतोय सोसतोय.या सत्तर वर्षात याच आरोपाच्या भांडवलावर या मंडळींनी सत्तेचा पुरेपुर भोग घेतला.सत्तेच्या जोरावर धर्मनिरपेक्षतेला वापरून घेतले.या मंडळींच्या धर्मनिरपेक्षतेची व्याख्याही सोयीस्कर आणि संकुचित होती.
धर्मानिरपेक्षता म्हणजे सर्व धर्मांना जात पंथांना समान न्याय समान हक्क.ही व्याख्या या मंडळींना कधीच मान्य नव्हती आणि आजही मान्य करायला तयार नाहीत.त्यांच्या दृष्टीने मुस्लीम बांधवांना झुकते माफ देणे म्हणजे धर्म निरपेक्षता.तसं पाहीलं तर या मःडळींना मुस्लीम बांधवाविषयी विशेष प्रेम होते,कळवळा होता असेही नाही. तर मुस्लीम बांधवांच्या मतांवर डोळा ठेवून बेगड्या धर्मनिरपेक्षतेच्या नावावर मुस्लीम बांधवांना खेळविण्याचे काम केले.
परिणामी धर्मनिरपेक्षतेचा अतिरेक होऊन बहुसंख्य हिंदू बहुजनांवरा सातत्याने अन्याय होत असल्याची भावना रूजू लागली.या कथित धर्म निरपेक्षतेला पाठींबा देतील ते पुरोगामी तर विरोध करणारे प्रतिगामी कडवे धर्मांध असा अपप्रचार सुरू झाला.
काँग्रेस आणि कथित पुरोगाम्यांचा हा बेगडी चेहरा उघड करणारे मोदी हे देखील त्यांच्या दृष्टीने कडवे धर्मांध ठरले.आणि मग मोदींचे खच्चीकरण सुरू झाले.मोदींनी पहिल्यांदा गुजरातचे मुख्यमंञी पद स्वीकारल्यानंतर झालेल्या दंगलीचे भांडवल करून मोदींना बदनाम करण्याची पुरस्कृत चळवळ सुरू झाली.तेव्हापासून म्हणजे सन 2002 पासून आजतागायत ते षडयंञ सुरू आहे.
मोदींचे दंगलग्रस्त गुजरात हिंदूराष्ट्र चळवळीचे केंद्र असल्याचा साक्षात्कार या मंडळीना झाला.तेच गुजरात राज्य नंतरच्या काळात देशासमोर विकासाचे रोल माडेल म्हणून उभे राहीले.अगदी काल परवाचे उदाहरण द्यायचे झाले तर उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणूकीत मुस्लीम बहूल मतदार संघात नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला मिळालेला प्रतिसाद या मंडळींचा पर्दाफाश करण्यास पुरेसा आहे.एकही मुस्लीम उमेदवार नसतांना मुस्लीम बांधवांनी मोदींना केलेले मतदान ही त्यांच्या खर्या धर्मनिरपेक्षकतेला दिलेली दाद आहे.हे नाकारता येणार नाही.
अनेकदा तोंडघशी पडूनही त्यांचा सुंभ माञ जळत नाही.उत्तरप्रदेशात सुफड साफ झाल्यानंतरही योगी आदित्यनाथ यांचे मुख्यमंञीपद त्यांना डाचते आहे.नेमके त्यांचे दुखणे काय आहे याची दखल उद्याच्या अंकात. (क्रमशः)