कपिलच्या शोवरुन सिद्धू आणि कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्यात तणाव?
चंदीगड, दि. 23 - नवज्योत सिंग सिद्धू यांनी टीव्ही शोमध्ये काम केलं तर त्यांच्याकडे असलेल्या खात्यात बदल होऊ शकतो, असे संकेत मुख्यमंत्री अमरिंदर सिंह बादल यांनी दिले आहेत. सिद्धू कपिल शर्माच्या शोमध्ये दिसतात. सोनी टीव्हीवरील ‘द कपिल शर्मा’ या शोमध्ये ते सेलिब्रिटी गेस्ट म्हणून झळकतात. टीव्ही शोमध्ये काम करण्यावर ठाम असल्याचा पुनरुच्चार माजी क्रिकेटर आणि पंजाब सरकारमधले मंत्री वज्योतसिंग सिद्धू यांनी केला.
मी 70 टक्के टी.व्ही. शो मध्ये काम करणं सोडलंय. आता फक्त एका शो साठी काही तास संध्याकाळ ते सकाळपर्यंत दिले. तर कोणीही हरकत घेण्याची गरज नाही, असंही सिद्धूनं म्हटलंय. अकाली दलाच्या सुखबीर बादल यांच्याप्रमाणे मी ट्रान्सपोर्टर होऊ शकत नाही. माझ्या कुटुंबाचा खर्च चालवण्यासाठी टी.व्ही शो मध्ये काम केलं तर लोकांच्या पोटात का दुखतंय, असा सवालही सिद्धूनं उपस्थित केला.