Breaking News

धुळ्याच्या मारहाणीविरोधातला निवासी डॉक्टरांचा राज्यव्यापी संप मागे

मुंबई, दि. 17 - मार्डनं पुकारलेला संप अखेर मागे घेण्यात आला. मुंबई हायकोर्टाच्या आदेशानंतर मार्डनं आजचा (17 मार्च) राज्यव्यापी पुकारलेला संप मागे घेतला. 16 मेडिकल कॉलेजमधील 5 हजार निवासी डॉक्टर संपावर जाणार होते. पण आता हा संप मागे घेतल्यानं अनेक रुग्णांनी अखेर सुटकेचा श्‍वास सोडला आहे. धुळ्यातील डॉक्टरला झालेल्या मारहाणीविरोधात हा संप पुकारला जाणार होता. पण कोर्टाच्या आदेशानंतर हा संप मागे घेण्यात आला आहे. मात्र, संप मागे घेतला असला तरी डॉक्टर शांततेनं निर्दशनं करणार आहेत. विशेष म्हणजे मार्डचे डॉक्टर संप करणार नाहीत, असं मार्डनं कोर्टात याआधी सांगितलं आहे. ही बाब त्यांच्या लक्षात आणून देताच, मार्डनं प्रस्तावित संप मागे घेतला आहे.