गद्दार सुरेश धस यांना धडा शिकवू : अजित पवार
बीड, दि. 22 - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी बीड जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत झालेल्या पराभवाची दखल घेतली आहे. पक्षविरोधी कृत्य करणार्यांवर लवकरच कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.
बीड जिल्हा परिषदेत कार्यकर्त्यांच्या परिश्रमांच्या बळावर राष्ट्रवादीच्या सर्वाधिक जागा निवडून आल्या. जिल्ह्यात मतदारांनी राष्ट्रवादीला स्पष्ट कौल दिला असतानाही पराभवाचा सामना करावा लागला, हा पराभव पक्षाच्या जिव्हारी लागला असल्याचं अजित पवारांनी म्हटलं आहे. पक्षाच्या जीवावर आमदारकी, राज्यमंत्रिपद उपभोगल्यानंतरही पक्षाशी गद्दारी करणार्यांना धडा शिकवण्यात येईल. अशा पक्षविरोधी कारवाया कदापि सहन केल्या जाणार नाहीत, असं म्हणत अजित पवारांनी माजी मंत्री सुरेश धस यांच्यावर शरसंधान साधलं आहे.