कथित धर्मनिरपेक्षतेच्या गोधडीची शिलाई उधडू लागली...!
दि. 21, मार्च - पंधरा वर्षापुर्वी नरेंद्र मोदी यांच्या नाचा शिमगा प्रसार माध्यमांनी खेळला .तेंव्हापासून कट्टर हिंदूत्ववादी चेहरा बनवून मोदींचे राजकीय विद्रूपीकरण करण्याचा खेळ माध्यमांनी मांडला आहे.कथिता धर्म निरपेक्षवाद्यांना,पुरोगाम्यांना हाताशी धरून मोदी हे मुस्लीम विरोधी असल्याची प्रतिमा निर्माण केली गेली.तेच मोदी देशाचे पंतप्रधान व्हावेत म्हणून देशातील तमाम मुस्लीम बांधवांनी पुढाकार घेतला.इतकेच नाही उत्तर प्रदेश सारखे राज्य देखील मोदींच्या ताब्यात दिले.हे कसे घडले? पुरोगाम्यांनी पांघरलेल्या कथित धर्मनिरपेक्षवादाच्या गोधडीची शिलाई उधडण्यास सुरूवात झाली असे म्हणायचे काय?भारताच्या राजकीय वाळवंटात नरेंद्र मोदी नावाचे वादळ घोंघावू लागल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या अफवांना उत येऊ लागला आहे.या अफवांचा अर्क काढून काही मंडळी मनप्रसूत कंड्याही पिकवण्यात अग्रेसर आहेत.विशेष म्हणजे लोकशाहीचा तिसरा डोळा म्हणविणारे प्रसार माध्यमं या मशागतीची अवजारे चालवू लागल्याने पिकवलेल्या कंड्यांचा भाव चांगलाच वधारतांना दिसतो आहे.भारतात रूजलेल्या धर्मनिरपेक्षतेला एकाचवेळी प्रतिगामी आणि पुरोगामी अशा दोन टोकाच्या भुमिकेचा सामना सामना करावा लागत असल्याने माध्यमांवर विसंबून असलेल्या मंडळींची फरफट होतांना दिसते आहे.
भारतासारख्या लोकशाही देशात वावरत असलेली धर्मनिरपेक्षता म्हणजे नेमकं काय याचा उलगडा खरेतर काल परवा पर्यंत केला जात नव्हता.एका विशिष्ट धर्माला झुकतं माफ देणं हाच गर्भीत अर्था कथित पुरोगाम्यांनी अलिकडच्या काळात दृढ करण्यास सुरूवात केली होती.त्या पुरोगाम्यांनी आपल्या चेहर्यावर ओढलेला धर्मनिरपेक्षतेचा बुरखा नरेंद्र मोदी यांच्या केंद्रस्थानी प्रवेशाने विरळ होऊन त्यांचे पांढरे चेहरे जनतेला दिसू लागले आहेत. भारतात हिंदू ,बौध्द,शिख ,ईसाई,मुस्लिम असे सर्व धर्म पंथाचे लोक राहतात म्हणून हे राष्ट्र धर्म निरपेक्ष. माञ याच धर्म निरपेक्षतेच्या नावाखाली सत्तेचे समिकरण यशस्वी व्हावे म्हणून राजकारण्यांनी विशिष्ट धर्माचे लांगूलचालन करीत सत्तेचा सारीपाट कायम ताब्यात ठेवला.प्रत्यक्षात ज्यांचे लांगुलचालन केले त्यांच्या पदरात काहीच टाकले नाही.सत्तर वर्षानंतरही त्यांची झोळी रिकामीच आहे,ही वास्तव आता उघड झाले आहे.आणि म्हणूनच नरेंद्र मोदी यांचा भारताच्या राजकीय क्षितिजावर उदय झाला.
नरेंद्र मोदी यांनी केंद्रात सत्ता स्थापन केल्या नंतर खर्या धर्म निरपेक्षतेचा अर्थ भारतालाच नव्हे तर जगाला हळूहळू उमजू लागलाय.हा आमचा दावा आहे.हा दावा किती तर्क शुध्द आहे याचा उहापोह उद्याच्या दखलमध्ये होईलच.तत्पुर्वी भारतात राबलेली धर्मनिरपेक्षता कशी बेगडी होती आणि ही बेगडी धर्मनिरपेक्षताच खरी धर्म निरपेक्षता आहे हे जनमानसाच्या मनावर बिंबविण्याचे पाप प्रसार माध्यमांनी केले हे दुर्लक्षित करता येणार नाही.अगदी नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच गुजरातचे मुख्यमंञी पद स्वीकारल्यानंतर झालेल्या दंगली पासून कालपरवाच्या उत्तरप्रदेशातील गोमांस प्रकरण व योगी आदित्यनाथ यांच्या शपथविधीपर्यंत माध्यमांनी मोदींना आरोपीच्या पिंजर्यात उभे करून आपणच धर्मनिरपेक्षतेचा ठेका घेतल्याचा आभास निर्माण केला.त्या आभासी प्रतिमेला नरेंद्र मोदी यांनी अतिशय धीर गंभीरपणे मात दिली आहे.त्यांच्या प्रत्येक आरोप वजा संशयाला कृतीतून उत्तर देत धर्मनिरपेक्षता कशी जपायची असते हे दाखविण्यास सुरूवात केली आहे.मोदींच्या धर्मनिरपेक्षतेसोबत ज्यांना आजपर्यंत स्वयंघोषित धर्मनिरपेक्षवाद्यांनी खेळवले ते अल्पसंख्यांक देखील आहेत हे विसरता येणार नाही.त्यांनीच कंड्या पिकविणारे माध्यम आणि कथित धर्मनिरपेक्ष पुरोगाम्यांनी तोंडघशी पाडले आहे.अल्पसंख्यांक किंवा विशिष्ट धर्म पंथीयांचे कृती शुन्य लाड करायचे ,बहुसंख्यांकाच्या भावना पायदळी तुडवायच्या म्हणजे धर्म निरपेक्षता हा आजवरचा प्रघात मोडीत काढणारी मोदींची भुमिका अल्पसंख्यांकांनीही स्वीकारल्याचे दिसते.हा बदल कसा झाला? मोदींची धर्म निरपेक्षता काय सांगते? याविषयी सविस्तर मांडणी उद्याच्या दखलमध्ये... (क्रमशः)