अच्छे दिनच्या पदराआड दडलयं काय...!
दि. 17, मार्च - नरेंद्र मोदी हेच भारतीय जनता पक्षाचा हुकमी चेहरा आहे असे वातावरण देशभर निर्माण करण्यात मंडळी यशस्वी झाली आहे.वास्तव माञ वेगळे आणि तितकेच भयानक आहे .अटलबिहारी वाजपेयी ते सुषमा स्वराज यांच्या पर्यतचा एकुण प्रवास पाहिल्या नंतर मोदींच्या डोक्यावर ठेवलेला यशोगाथेचा जिरेटोप फसवा आहे हे लक्षात येईल.माञ त्यासाठी काही काळ प्रतिक्षा करावी लागेल,भाजपाच्या यशाला कटकारस्थानाची कोळीष्टीकं चिकटत आहेत.त्याचे पापही मोदींच्या नावावर आपसूक जमा होतय.आणि याच पापाचा हिशेब द्यायची वेळ येईल तेंव्हा मोदींना अटल अडवाणी स्वराज यांच्या पंक्तीत बसविले जाईल.
विकासासाठी मंजूर झालेला एक रूपया लाभार्थीपर्यंत पोहचत नाही 95 पैशांची गळती होते,हे वास्तव सर्वप्रथम राजीव गांधींनी बोलून दाखविले होते.साठ वर्षाचा हा कारभार जनतेला काँग्रेस विरूध्द भुमिका घ्यायला कारणीभूत ठरला.जनतेच्या मनात खदखदत असलेला असंतोष नेमकेपणाने हेरून जनसंघ आणि आजच्या भाजपाने फासे टाकणारी रणनिती आखण्यास सुरूवात केली.टप्प्या टप्प्याने अंमलबजावणी करीत आज दाक्षिणात्यांचा एखाद दुसरा अपवाद सोडला तर अवघ्या भारतभर याच रणनितीचा अंमल सुरू झालाय.सध्यातरी नरेंद्र मोदी विद्यमान रणनितीचे शिल्पकार मानले जात असले तरी हा सन्मान त्यांच्या शिरपेचावर किती दिवस मिरवू दिला जाईल या विषयी शंकाच आहे.
नरेंद्र मोदी यांच्या हातात भाजपाचे सुञे देऊन हिंदू राष्ट्राच्या थिंक टँकने पध्दतशीरपणे पहिला निशाणा साधला.सामान्य कुंटूबातला,ओबीसी प्रवर्गातला,एक साधा चहा वाटणारा पोरगा,राष्ट्र कल्याणासाठी काही काळ अज्ञातवासात राहून तपश्चर्या करणारा नरेंद्र नावाचा कार्यकर्ता मुख्यमंञी बनतो.पंधरा वर्षानंतर बदलता भारत घडविण्याचे स्वप्न दाखवून भारतीयांवर मोहीनी टाकतो.आणि जयप्रकाश नारायण,एस एम जोशी,अटल बिहारी वाजपेयी अशा खर्या लोकाभिमुख लोकनेत्यांना आयुष्यभर जनप्रबोधन करून शक्य झाले नाही ते या अवलियाने अवघ्या वर्षात शक्य करून दाखविले.एव्हढेच नाही तर भाजपा वर्णिय राजकीय विचारसरणीला अशक्य ते शक्य करून दाखविल्यामुळे अवघ्या शंभर दिवसात जादू करण्याचे मोहीनी अस्र डागले.प्रत्यक्षात शंभर दिवस जाऊ द्या आठशे दिवस ऊलटूनही सामान्य जनतेच्या पदरात आश्वासनांच्या धोंड्या शिवाय काहीच पडलेले दिसत नाही.नाही म्हणायला वेगवेगळे जादुचे प्रयोग पाहण्याचे थोर भाग्य माञ लाभले.हे जादुचे प्रयोग जनतेच्या जीवावरच अधिक बेतले.तिसरे वर्ष सुरू झाले असतांना दिलेला एकही शब्द खरा होताना दिसत नाही.अस एखादं उदाहरण शोधायचं म्हटल तरी द्रविडी प्राणायाम करावा लागेल.जनतेच्या आशा आकांक्षांना सपशेल हरताळ फासणार्या या सत्ताधार्यांविरूध्द देशभरात प्रचंड असंतोष व्यक्त होऊ लागला होता.आजही विरोधाची तिव्रता तेव्हढीच आहे.हा असंतोष पाच राज्य आणि महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत मतपेटीतून व्यक्त होईल असा अंदाजच नव्हे तर जाणकारांचा ठाम विश्वास होता.प्रत्यक्षात निवडणुकांचे निकाल धक्का देणारे ठरले.विरोधकांना अनपेक्षित व्हाईट वाश देणारे निकाल हाती आले.हे निकाल ऐकल्या नंतर जाणकार सोडा ज्यांनी मतांचे दान केले त्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला.या आश्चर्या पाठोपाठ असंतोष आणखी वाढतांना दिसतो आहे.या निकालांवर लोकांचा अजूनही विश्वास बसत नाही.भाजपाने झोल केल्याचा आरोप देशभरातून होत आहे.हा आरोप अगदीच तथ्य हीन आहे असे म्हणता येणार नाही.भाजपाने झोल केला हे उघड गुपीत आहे,माञ कसा आणि कुठल्या पातळीवर केला या विषयी मंथन व्हायला हवे.केवळ मंथन नव्हे तर देशपातळीवर जन उठाव होणे आवश्यक आहे.