पिंपरी महापालिकेची महसुली व भांडवली बिले भरण्याची 31 मार्च हीच अंतिम तारीख
पुणे, दि. 22 - पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त 24 मार्चपर्यंत महसुली व भांडवली बिले भरण्याचा दिलेला आदेश मागे घेणार आहेत. त्यानुसार आता महसुली व भांडवली बिले नेहमीप्रमाणे 31 मार्च अखेरपर्यंत भरता येणार आहेत. यासाठी नगरसेवक विलास मडिगेरी यांनी महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांच्याकडे मागणी केली होती.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या 2017-18 च्या आर्थिक अंदाजपत्रक बनविण्यास सुरुवात झाली असून त्यानुसार यंदा भांडवली व महसुलाची बिले 24 मार्चपर्यंत लेखा विभागात सादर करावीत, असे आदेश महापालिका आयुक्तांनी काढले होते. मात्र, महापालिकेची परंपरा मोडीत काढू नये. तसेच निवडणुकांमुळे बरीच कामे रखडली आहेत. त्यासाठी ही मुदत दरवर्षीप्रमाणे 31 मार्च ठेवावी अशी मागणी, नगरसेवक विलास मडिगेरी यांनी केली होती. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या लेखा विभागातर्फे 4 मार्च रोजी काढण्यात आलेल्या आदेशाप्रमाणे महापालिकेतील विविध विभागांना आदेश देण्यात आले होते की 24 मार्च अखेर सर्व महसुली व भांडवली बिले सादर करावीत. यामध्ये केवळ पाणी व वीज बिले अशी अत्यावश्यक बिले सादर करण्यास 29 मार्चपर्यंतची वेळ देण्यात आली होती.
मात्र, याविषयी आक्षेप घेत नगरसेवक मडिगेरी यांनी हा आदेश रद्द करण्यासाठी आयुक्तांना निवेदन दिले आहे. याविषयी एमपीसी न्यूजशी बोलताना मडिगेरी म्हणाले की, दरवर्षीची म्हणजे महापालिकेच्या स्थापनेपासूनची ही प्रथा आहे की 29 तारखेपर्यंत प्रभागातील कामे चालतात व त्यानंतर 31 मार्चला बिले सादर केली जातत. मात्र, यावेळी ही तारीख 24 मार्च केली आहे. त्यामुळे ठेकेदारांनी आत्तापासूनच काम थांबवले आहे. महापालिका निवडणुकांमुळे बरीच कामे रखडली आहेत. आठ दिवसाच्या काळात ती कामे मार्गी लागू शकतात. त्यामुळे हा आदेश मागे घेण्यात यावा व दरवर्षीप्रमाणे ही मुदत 31 मार्च अखेरपर्यंतच ठेवावी. तसेच बिलांची तारीख 10 ते 15 एप्रिलपर्यंत ठेवावी, जेणेकरून प्रथा कायम राहील व कामेही मार्गी लागतील, अशी मागणी त्यांनी केली होती.