’धोनी आजही कसोटी क्रिकेट खेळू शकतो’- मोहम्मद कैफ
कोलकाता, दि. 27 - महेंद्र सिंह धोनीच्या फलंदाजीबाबत गेल्या काही दिवसांपासून प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहहे. पण विजय हजारे करंडकात झारखंडकडून खेळताना छत्तीसगड विरुद्ध शानदार शतक ठोकलं. धोनीच्या या शतकानं छत्तीसगडचा कर्णधार मोहम्मद कैफ मात्र, बराच खुश झाला आहे. कैफला अजूनही वाटतं की, धोनी आजही तिनही फॉर्मेटमध्ये खेळू शकतो. झारखंडनं छत्तीसगडवर 78 धावांनी दणदणीत विजय मिळवल्यानंतर छत्तीसगडचा कर्णधार कैफ म्हणाला की, ‘धोनीकडे नैसर्गिक गुणवत्ता आहे. जे तुम्हीही आजपर्यंत पाहत आला आहात. माझं मत आहे की, वनडे, टी-20 आणि कसोटीत आजही धोनी खेळू शकतो. तो आजही प्रत्येक चेंडूवर जोरदार फटका मारु शकतं.’ कैफ पुढे असंही म्हणाला की, ‘मी धोनीला त्याच्या पदार्पणातील सामन्यापासून पाहात आलो आहे. मला नेहमी वाटतं की, फक्त प्रशिक्षणानं तुम्ही धोनी बनू शकत नाही.’