Breaking News

ऑस्कर सोहळ्यात दिवंगत अभिनेते ओम पुरींना श्रद्धांजली

कॅलिफोर्निया, दि. 28 - ‘ईस्ट इज ईस्ट’, ‘गांधी’, ‘सिटी ऑफ जॉय’ आणि ‘वूल्फ’ अशा लोकप्रिय सिनेमात काम केलेले दिवंगत अभिनेते ओम पुरी यांना ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात श्रद्धांजली वाहण्यात आली. कॅलिफोर्नियाच्या डॉल्बी थिएटरमध्ये 89 वा ऑस्कर सोहळा पार पडला.
ओम पुरींना ऑस्कर सोहळ्यात कॅरी फिशर, प्रिंस, जेने वाईल्डर, मायकल किमिनो, पॅटी ड्यूक, गॅरी मार्शल, अँटन येल्चिन, मॅरी टेलर मूर, कर्टिस हॅन्सन आणि जॉन हर्ट यांच्यासोबत श्रद्धांजली वाहण्यात आली. सारा बरेइलिसकडून दिवंगत कलाकारांच्या स्मरणार्थ गीत सादर करत त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
ओम पुरींनी ‘गांधी’ या सिनेमातून आंतरराष्ट्रीय सिनेमात पाऊल ठेवलं होतं. त्यानंतर त्यांनी ‘ईस्ट इज ईस्ट’, ‘माय सल दी फॅनेटिक’ आणि ‘दी पॅरोल ऑफिसर’ अशा सिनेमांमध्ये आपल्या दमदार अभिनयाची आणि भारदार आवाजाची छाप सोडली.