अहमदनगर-बीड-परळी रेल्वे मार्ग लवकरच दृष्टीक्षेपात!
अहमदनगर, दि. 26 - अहमदनगर-बीड-परळी हा रेल्वे मार्ग लवकरच दृष्टीक्षेपात येणार आहे. रेल्वे मार्गाचं काम प्रगती पथावर असून पहिल्या टप्प्यातील अहमदनगर ते नारायणडोह रेल्वे मार्ग एका महिन्यात पूर्ण होणार आहे. काही दिवसांपूर्वीच या मार्गावर रेल्वे इंजिन धावताना पाहायला मिळालं होतं. अहमदनगर-बीड हा रेल्वे मार्गाचा टप्पा दोन वर्षांत, तर बीड-परळी हा टप्पा तीन वर्षात पूर्ण होईल, अशी माहिती मध्य रेल्वेचे महाप्रबंधक डी.के. मिश्रा यांनी दिली. मिश्रा यांनी शनिवारी रेल्वे स्थानकाची पाहणी करुन कामांचाही आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते.
अहमदनगर-बीड-परळी रेल्वे मार्गामुळे बीड जिल्ह्याचं रेल्वेचं अनेक दिवसाचं स्वप्न लवकरच दृष्टीक्षेपात येईल. या रेल्वे मार्गामुळे परळी आणि बीड रेल्वेच्या नकाशावर येतील. त्यामुळे मराठवाड्याचं दळणवळण वाढण्यास मदत होणार आहे. अहमदनगर रेल्वे स्थानक भौगोलिक दृष्ट्या राज्यातील महत्वाचं स्टेशन असल्याचं मिश्रा यांनी म्हटलं. अहमदनगर रेल्वे स्थानकाला मॉडेल रेल्वे स्टेशन बनवण्याचा प्रयत्न सुरु आहे. लवकरच सरकते जीने, लिफ्ट आणि एलईडी दिवे, सीसीटीव्ही बसवण्यात येतील, अशी माहितीही त्यांनी दिली.
राज्यातील साधारण 22 हजार कोटींचे नऊ प्रकल्पही लवकरात लवकर पूर्ण करणार असल्याची माहिती मिश्रा यांनी दिली. तर दौंड-पुणे बायपास कॉड लाईनचं काम मंजूर झालं असून दीड किलोमीटर जागा अधिगृहित करायची आहे. पुढच्या वर्षी हे काम सुरु होईल, असं मिश्रा म्हणाले. दौंड-मनमाड मार्गाचं दुहेरीकरण करण्यासाठी लवकरच टेंडर निघणार असल्याचं मिश्रा यांनी सांगितलं. यामुळे रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. दरम्यान यंदाच्या अर्थसंकल्पात या रेल्वे मार्गासाठी सर्वाधिक 780 कोटींची भरीव तरतूद करण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी पहिल्या वर्षी 159 कोटी, दुसर्या वर्षी 300 कोटी आणि आता 780 कोटींची तरतूद रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी केली आहे. याशिवाय राज्य सरकारचा वाटा या तरतुदी व्यतिरिक्त असणार आहे.