भारताचा दारुण पराभव!
पुणे, दि. 25 - पुणे कसोटीत ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा दारुण पराभव केला. पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने तब्बल 333 धावांनी विजय मिळवत, तिसर्या दिवशीच खेळ खल्लास केला. जगातील सर्वोत्तम फलंदाजांचा संघ अशी ओळख असलेली विराट कोहलीची टीम इंडिया अवघ्या तीन तासात ढेपाळली. भारताचा दुसरा डाव अवघ्या 107 धावांत गुंडाळून, ऑस्ट्रेलियाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.
या कसोटीत ऑस्ट्रेलियानं भारताला विजयासाठी 441 धावांचं डोंगराएवढं आव्हान दिलं होतं. त्याचा पाठलाग करताना, पहिल्या डावाप्रमाणेच टीम इंडियाने पुन्हा एकदा नांगी टाकली. स्टीव्ह ओ’कीफनं ऑस्ट्रेलियाच्या विजयाचा हिरो ठरला. एकट्या ओकिफीने भारताच्या पहिल्या डावात 6 आणि दुसर्या डावातही 6 अशा 12 विकेट घेतल्या. विराट कोहली आणि त्याच्या सहकार्यांच्या कचखाऊ फलंदाजीमुळंच भारतावर पहिल्या कसोटीत लाजिरवाण्या पराभवाची वेळ आली.
भारताचा सलामीवीर मुरली विजय 2, लोकेश राहुल 10, विराट कोहली 13, अजिंक्य रहाणे 18 ,रवीचंद्रन अश्विन 8, सहा 5, जाडेजा 3, अशी माघारी परतणार्यांची रांग लागली. नाही म्हणायला चेतेश्वर पुजाराने 31 धावा करत एक बाजू लावून धरण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला दुसर्या बाजूने अजिबात साथ मिळाली नाही.