मुंबई-नागपूर विमानात दोन हवाई सुंदरींची छेडछाड
नागपूर, दि. 28 - जेट एअरवेजच्या मुंबई-नागपूर विमानात दोन हवाई सुंदरींची छेडछाड केल्याची घटना घडली. 23 वर्षीय आकाश गुप्ता असं छेडछाड करणार्या व्यक्तीचं नाव असून तो हार्डवेअर इंजिनिअर असल्याची माहिती आहे.
पीडित हवाई सुंदरींनी फ्लाईट कॅप्टनला या घटनेची लेखी तक्रार दिली. त्यानंतर फ्लाईट कॅप्टनने संबंधित व्यक्तीला सीआरपीएफच्या ताब्यात दिलं. आकाश गुप्ता मध्य प्रदेशातील बालाघाट येथे राहणारा आहे. सीआरपीएफने त्याला सोनेगाव पोलिसांच्या ताब्यात दिलं असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईहून गोव्याला येताना आकाश गुप्ताने मद्यधुंद अवस्थेत हवाई सुंदरींचा हात पकडला असावा, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला. हवाई सुंदरींनी तातडीने इतर क्रू सदस्यांना ही माहिती दिली, तरीही गुप्ताची अरेरावी चालू होती. त्यामुळे फ्लाईट कॅप्टनला माहिती देण्यात आली.