पुणे-बेंगलोर महामार्गावरील चोरीचा 12 तासात छडा; दोघेजण ताब्यात
सातारा, दि. 26 (प्रतिनिधी) : राष्ट्रीय महामार्गावर एका दुचाकी चालकाला अडवून जबरी चोरी करणार्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेऊन 12 तासांच्या आत गुन्हेगारांचा छडा लावला.
याबाबत माहिती अशी की, फिर्यादी सिध्दाराम शांताप्पा कोळी (रा. काले, ता. कराड) हे कराड बाजूकडे जात होते. त्यावेळी पाठीमागून दोन व्यक्ती नंबर प्लेट नसलेल्या टीव्हीएस मोटारसायलवरुन येऊन त्यांनी मोटारसायकल आडवी मारुन तू आम्हाला कट मारुन का आलास असे विचारुन शिवीगाळ केली. तुझ्याकडे किती पैसे आहे, अशी विचारणा करुन कोळींना मारहाण करुन त्यांच्या ताब्यातील मोटारसायकल व हातामधील घड्याळ जबरदस्तीने चोरुन नेले. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. जिल्हा पोलीस प्रमुख संदीप पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडे संशयित आरोपींचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांंच्या मार्गदर्शनाखाली रमेश गर्जे व प्रसन्न जर्हाड यांनी अविनाश विलास दडस (वय 23), संदीप ऊर्फ बाबू दिलीप साबळे (वय 21, दोघेही रा. आरफळ, ता. सातारा) यांना लोणंद रस्त्यावरील ग्रीन लॉन येथून ताब्यात घेतले. तपास पथकाने त्यांच्याकडे सखोल चौकशी केल्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.