Breaking News

कच्च्या रस्त्यामुळे ग्रामस्थांना नरकयातना!

देऊळगावराजा वासीयांच्या डोळ्यात धूळच....

बुलडाणा, दि. 31 - कच्च्या रस्त्यांची परिस्थिती बघायची असेल, तर खेड्यांत जा‘, असे सांगितले जाते. परंतु आता खेड्यांतही जाण्याची गरज नाही. देऊळगाव  राजातच त्याचा अनुभव वाहनचालकांना बरोबरच ग्रामस्थांना घेता येत आहे. शहरात ट्राफीक जॅम होऊ नये म्हणून राज्य शासना मार्फत शहरा बाहेरून बायपास  रस्ता मंजूर झाला असून बायपास चे काम गेल्या अनेक महिन्यांपासून रखडले आहे व या कारनास्तव सदर रस्त्याजवळील परिसर धुळीच्या साम्राज्याखाली आला  आहे.
धुळीमुळे नागरिकांना अ‍ॅलर्जी आणि श्‍वसनाचे आजार जडण्यास सुरुवात झाली असून, परिसरातील क्लिनिकमध्ये नाक आणि घशांचे आजार असलेले  रुग्ण वाढलत आहेत. गेल्या काही दिवसात देऊळगाव राजा येथील दिग्गजांनी नेते ही त्या बायपास रस्त्यावरील धूळ अनुभवत आहे पांढरी खादी मळकी करायला  ते तयार आहे  परंतू या समस्येवर मात्र काहीच तोडगा काढताना ही मंडळी दिसत नाही.सदर समस्येवर राज्यशासनाने व तसेच नगरपालिकेने लक्ष घालून या  धूळीच्या साम्राज्यातून ग्रामस्थांना मूक्त करावे अशी मागणी ग्रामस्थ करत आहे.
देऊळगाव राजा येथील बायपास रोड रस्त्याचे काम न झाल्याने येथून जाणार्‍या वाहनचालक, नागरिकांना धुळीतून जावे लागत आहे. तो रस्ता म्हणजे  नरकयातना देणारा ठरतो आहे. प्रशासनाने जनतेला यातना देण्याचे प्रकार कुठे तरी थांबले पाहिजे. रस्त्याने काम करण्याचा विचार प्रशासन करणार की नाही.  लवकरात लवकर रस्त्याचे काम सुरू करून नागरिकांची धुळीतून सुटका व्हावी. अक्षरश: त्या रस्त्यावर धूळच धूळ असून,देऊळगावकराच्या डोळ्यात धूळच धूळ  अस म्हणन्याची परिस्थिती जनते वर येऊन ठेपली आहे. धूळ आणि बोचर्‍या थंडीमुळे नागरिकांना त्वचा आणि श्‍वसनाचे आजार जडू लागले आहेत. नागरिकांची  सहनशीलता आता संपली आहे. तरी या समस्येवर देऊळगाव शहरातील दिग्गजांनी लक्ष घालून ह्या समस्येवर अंकूश लावाला.