कावळ्यांनी फिरवली पाठ; मावळ्यांनी केले चक्काजामचे नियोजन
पाच कन्या करणार आंदोलनाचे नेतृत्व
कुमार कडलग/नाशिक, दि. 30 - मराठा क्रांती मोर्चाने येत्या 31 जानेवारी रोजी राज्यव्यापी चक्काजाम आंदोलनाची हाक दिली असून क्रांती मोर्चाच्या धर्तीवर हा चक्काजाम देखील शांततामय मार्गाने तसेच समाजाला कुठल्याही वेदना होणार नाहीत याची खबरदारीही चक्का जाम आंदोलनात घेण्याचे सुचीत करण्यात आले. या चक्का जाम आंदोलनाचे नियोजन करण्यासाठी ठिकठिकाणी नियोजनाच्या बैठका सुरू आहेत.त् याचाच एक भाग म्हणून नाशिककर सकल मराठा समाजाच्या वतीने रविवारी औरंगाबाद राज्य मार्गावरील वरद लक्ष्मी लान्स वर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.मराठा समाजाच्या तरूणांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदविला असला तरी एरवी विशेषतः निवडणुक काळात समाजाचा हवाला देणारे चेहरे एखाद दुसरा अपवाद वगळता या बैठकीत चमकलेच नाहीत म्हणून उपस्थित तरूणाईमध्ये प्रचंड रोष व्यक्त होतांना दिसला. या राजकीय कावळ्यांना त्यांची जागा दाखवून देत असतानाच जे चेहरे चक्का जाम आंदोलनात दिसणार नाहीत त्या उमेदवारांसह राजकीय नेत्यांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णयही बैठकीतील तरूणांनी घेतला. छ.शिवरायांनी कावळ्यांच्या नव्हे मावळ्यांच्या भरवशावर स्वराज्य निर्माण केले, त्या राजाचे वारस म्हणून मराठा क्रांती मोर्चालाही या राजकीय कावळ्याची पर्वा करण्याची गरज नाही मराठा क्रांती मोर्चाचा अजेंडा राबविण्यास मावळे सक्षम आहेत.असा गर्भीत इशारा देऊन मराठा क्रांती मोर्चाच्या उपस्थित जेष्ठ मार्गदर्शकांच्या सुचनांनुसार तरूणांनी चक्काजाम आंदोलनाचे नियोजन केले.या नियोजनाप्रमाणे 31जानेवारीला नाशिक शहराच्या चारही दिशेला मोठ्या संख्येने चक्काजाम करून सिन्नर फाटा, हाटेल जञा चांदोरी सायखेडा चौफुली ,पेठरोडवर आशावाडी तसेच जिल्ह्यातील दिंडोरी, ईगतपूरी सिन्नर अशा सर्व तालूक्यातील मराठा समाज ताकद दाखवणार आहे.या एकूणच आंदोलना दरम्यान कुठलेही समाज विघातक कृत्य करायचे नाही,कुणी खोडसाळपणे तसा प्रयत्न केल्यास त्याला पोलीसांच्या हवाली करण्याच्याही सुचना देण्यात आल्या .घोषणांसंदर्भातही आचार संहीता जाहीर करण्यात आली असून छ.शिवराय,आई जीजाऊ यांच्या व्यतिरिक्त अन्य घोषणा द्यायच्या नाहीत,कुठलाही राजकीय पक्षअथवा व्यक्ती अथवा समाजाविषयी देखिल घोषणांवर बंदी असेल.या शिवाय क्रांती मोर्चा दरम्यान घेतलेली सर्व खबरदारी चक्काजाम आंदोलनातही घ्यायची असून आरोग्यसेवा,शिक्षणसेवा, दुध भाजीपाला वाहने यांना मार्ग मोकळा करून देत असतानाच चक्काजाम आंदोलनामुळे अडकून पडलेल्या प्रवाशांना पाणी प्रसंगी आवश्यक त्यांना नाश्ता,औषधोपचार पुरविण्याच्या सुचना आवर्जून करण्यात आल्या .क्रांती मोर्चाचे शांतता,स्वच्छता आणि इतरांबद्दल असूया न बाळगणे हे वैशिष्टे समाजाविषयी सकारात्मक वातावरण निर्माण करण्यास कारणीभुत ठरले,इतकेच नाही तर इतरांनाही मराठा क्रांती मोर्चाच कित्ता गिरवावा लागला.चक्का जाम आंदोलनानेही हेच साध्य करावे अशी अपेक्षाही या वेळी व्यक्त करण्यात आली.विशेष म्हणजे मराठा क्रांती मोर्चाचे नेतृत्व मुलींनी केले होते,चक्काजाम आंदोलनाचे नेतृत्वही मुलीच करणार असून पाच कन्या जमावाशी आंदोलना दरम्यान संवाद साधणार आहेत ,या दरम्यान पोलीस यंञणेला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आवाहन बैठकीने केले.
शिवजयंती 19 फेब्रूवारीलाच
छत्रपती शिवरायांच्या जयंती तारखेचा घोळ घालून बहूजन समाजाची दिशाभुल करणार्या शक्तींना धडा शिकविण्याचा निर्धारही या बैठकीत करण्यात आला असून शिवजयंती 19 फेब्रूवारीलाच करण्याचा ठरावही या बैठकीत मंजूर केला.राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांचा विचार न करता शिव जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्याचे आवाहनही करण्यात आले.
