ठाणे येथे पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण
ठाणे, दि. 27 - भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त आज सकाळी साकेत मैदान येथे मुख्य शासकीयसोहळ्यात जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. प्रजासत्ताक दिनाच्या संचलनामध्ये राज्य राखीव दलापासून, ठाणे शहर पोलीस, वाहतूक पोलीस, कारागृह रक्षक, गृहरक्षक, कमांडो पथक, बॉम्बशोधक आणि नाशक पथक, दंगारोधक पथक अशा विविध पथकांचा समावेश होता. याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ महेंद्र कल्याणकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किशोर राजे निंबाळकर, मनपा आयुक्त संजीव जयस्वाल, पोलीस आयुक्त परम वीर सिंह यांची प्रमुख उपस्थिती होती.
तरुण पिढीला योग्य दिशा दाखविण्याची गरज
ध्वजारोहणानंतर बोलतांना पालकमंत्र्यांनी नागरिकांना आपल्या हक्कासोबतच कर्तव्याचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की,आजचा तरुण वर्ग उद्याचा प्रशासक असून तो देश पुढे नेणार आहे.गरज आहे ती या तरुण पिढीला योग्य ते मार्गदर्शन करण्याची. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जेव्हा या देशाची घटना लिहिली तेव्हा त्यांच्यासमोर देशातील सर्वात शेवटचा माणूस होता त्यामुळेच आपल्याला ही तळागाळातल्या माणसाचा पहिले विचार करावा लागेल, त्याला अन्न ,वस्त्र, निवारा मिळेल हे पाहिले पाहिजे असेही पालकमंत्री म्हणाले.
पालकमंत्र्यांनी परेडची पाहणी केल्यानंतर शानदार संचालन झाले. ठाणे महानगरपालिका सुरक्षा दल, अग्निशमन दल, सरस्वती विद्यालय, राबोडी, एस.एन.एम. हायस्कूल, मुंब्रा, ठाणे ग्रामीण पोलीस मुख्यालय, राज्य राखीव डाळ, पोलीस परिमंडळ 1 आणि 5, शहर वाहतूक शाखा, होमगार्ड , राज्य उत्पादन शुल्क, प्रादेशिक परिवहन विभाग यांनी संचालन केले. त्याचबरोबरमतदानाचासंदेशदेणारामनपाचाचित्ररथ, ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाचा डिजिटल पेमेंटवर आधारित चित्ररथ यांनी देखील नागरिकांची वाहवा मिळवली. यावेळी प्रथमच संचालनात सामील अग्निशमन यंत्रे बसविलेल्या सुसज्ज मोटारसायकलवरील जवानांना देखील दाद मिळाली.
शहापूर येथील समृद्धी संस्थेने यावेळी तारपा नृत्य तर बांदोडकर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मतदानाचा संदेश देणारे पथनाट्य सादर केले.
साकेत येथील कार्यक्रमात स्वातंत्र्य सैनिक, शाळा, महाविद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमास लोकप्रतिनिधी तसेच अधिकारी-कर्मचारीही उपास्थित होते.
ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण
तत्पूर्वी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ महेंद्र कल्याणकर यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. सकाळी 7 वाजून 15 मिनिटांनी जिल्हाधिकारी यांच्या निवासस्थानी देखील ध्वजारोहण झाले. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रवीण शिंदे उपस्थित होते.