महाराष्ट्राला अग्रस्थानी कायम ठेवण्याचा निर्धार करूया - राज्यपाल
मुंबई, दि. 27 - देशातीलप्रमुखराज्यम्हणूनमहाराष्ट्रालाअग्रस्थानीठेवून, भविष्यात विकासाची सतत नवनवीन शिखरे गाठण्याचा आपण सर्वजण निर्धार करूया, असे आवाहन राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी येथे केले.
भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त शिवाजी पार्क येथे आयोजित मुख्य शासकीय समारंभात ते बोलत होते. यावेळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, परिवहन मंत्री दिवाकर रावते, महापौर स्नेहल आंबेकर, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, राजशिष्टाचार विभागाचे अपर मुख्य सचिव सुमित मल्लिक यांच्यासह मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी, सेना दल, तटरक्षक दल, पोलीस दल आदी विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
राज्यपाल श्री. राव म्हणाले की, आपल्या संविधानातील लोकशाही मूल्ये अधिक बळकट करण्यासाठी, आपली बांधीलकी अधिक दृढ करण्यासाठी आणि देशाच्या तसेच राज्याच्या सर्वांगीण विकासाकरिता काम करण्यासाठी स्वत:ला वचनबद्ध करण्याचा हा दिवस आहे. संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि घटना समितीच्या अन्य सदस्यांना मी याप्रसंगी नम्रपणे आदरांजली अर्पण करतो. लोकशाही व समाजवादी व्यवस्थेची उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी दीर्घ व खडतर मार्ग आम्ही यशस्वीरीत्या पूर्ण केलेला आहे. आज आपण मागे वळून पाहिले असता, जीवनाच्या विविध क्षेत्रात आपल्या संघटित प्रयत्नांतून प्रगती करणे शक्य झाल्याचे आम्हाला समाधान वाटते. आपल्या अर्थव्यवस्थेत आमूलाग्र बदल होत आहेत. हे बदल विचारात घेऊन सर्वांगीण विकास साध्य करण्याच्या दिशेने राज्याची वाटचाल सुरू आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
राज्यपाल श्री. राव म्हणाले की, अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्राने विज्ञान व तंत्रज्ञान आयोगाची स्थापना केली आहे. सर्व नागरिकांची सुरक्षा अधिक बळकट होण्यासाठी आणि दहशतवादी हल्ल्यांना प्रतिबंध करण्यासाठी मुंबई, पुणे आणि नागपूर या शहरांमध्ये 7 हजार 261 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.
राज्यात महानगरपालिका आणि पंचायत राज संस्था, जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या यांची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. संविधानातील त्र्याहत्तराव्या व चौर्याहत्तराव्या सुधारणांनंतर घटनात्मक संस्थांचा दर्जा प्राप्त झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांप्रती आपला विश्वास व बांधीलकी लोकशाही आचरणातून प्रतिबिंबित होते. महाराष्ट्रातील जनतेने लोकशाही मूल्ये बळकट होण्यासाठी शिस्तबद्ध व शांततापूर्ण रीतीने आपल्या मताधिकाराचा अवश्य वापर करावा, असे आवाहनही राज्यपाल श्री. राव यांनी यावेळी केले.
महाराष्ट्राने सर्वांगीण विकासाच्या वाटचालीस प्रारंभ केला आहे. राष्ट्रउभारणीच्या या प्रयत्नात शासनाबरोबर सक्रियपणे सर्वांनी सहभागी व्हावे. आपण सर्वजण मिळून सुसंधी, उद्योग, सामाजिक समानता व बंधुतेची भूमी म्हणून महाराष्ट्राचा नावलौकिक आणखी उंच करुया, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी राज्यपाल श्री. राव यांच्या भाषणाच्या मराठी अनुवादाचे वाचन केले.
यावेळी भारतीय नौदल, तटरक्षक दल, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल, राज्य राखीव पोलीस बल, बृहन्मुंबई पोलीस सशस्त्र दल, बृहन्मुंबई पोलीस दंगल नियंत्रण पथक, बृहन्मुंबई सशस्त्र महिला पोलीस, मुंबई रेल्वे पोलीस दल, सशस्त्र गृहरक्षक दल, वाहतूक पोलीस दल, राज्य उत्पादन शुल्क, नागरी संरक्षण दल, अग्निशमन दल, मनपा सुरक्षा दल, वन विभाग, राष्ट्रीय सेवा योजना, सी कॅडेट कोअर, मुंबईतील विविध विद्यालयातील मुले आणि मुलांची आरएसपी दले, विविध शाळांमधील मुले आणि मुलींची भारत स्काऊट आणि गाईड्सची पथके, बृहन्मुंबई पोलीस दल, मुंबई रेल्वे पोलीस दल, राज्य राखीव पोलीस दल यांची बॅण्ड पथके, राज्य राखीव पोलीस बलाचे पाईप बँड पथक, वाहतूक पोलीस मोटार सायकल पथक आदी विविध दलांनी संचलन केले. याप्रसंगी नौदल, पोलीस दल यांची वाहने तसेच महिला सुरक्षा पथक व्हॅन, महारक्षक बुलेटप्रुफ व्हॅन, वरूण वॉटर कॅनन आदी वाहनेही संचलनात सहभागी झाली होती. तसेच वन विभाग, गृहनिर्माण विभाग, ऊर्जा विभाग, एमएमआरडीए, पाणीपुरवठा व स्वच्छता, कृषी, राज्य निवडणूक आयोग, नगरविकास, वाहतूक पोलीस, उद्योग आदी विविध विभागांच्या चित्ररथांनीही आपले सादरीकरण केले. शिबानी जोशी व दिपक वेलणकर यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले.प्रजासत्ताक दिनानिमित्त विधानभवनात ध्वजारोहण
मुंबई, दि. 27 - भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त विधान भवनात विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते आणि विधान सभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी विधान परिषद सदस्या डॉ. निलम गोर्हे, विधान सभा सदस्य राहूल बोंद्रे , विधीमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव डॉ. अनंत कळसे, सचिव उत्तमसिंग चव्हाण, सहसचिव अशोक मोहिते, सभापतींचे सचिव महेंद्र काज, विशेष कार्य अधिकारी सुभाषचंद्र मयेकर, उपसचिव शिवदर्शन साठ्ये, अध्यक्षांचे सचिव राजकुमार सागर, उपसचिव राजेश तारवी, अवर सचिव ऋतुराज कुडतरकर, संतोष पारडकर, सोमनाथ सानप, रविंद्र जगदाळे, सुनिल झोरे, श्रीकांत शेटे, रंगनाथ खैरे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. यावेळी मुख्य सुरक्षा अधिकारी शशीकांत बोराटे यांच्या नेतृत्वाखाली ल पथकाने मान वंदना दिली.