Breaking News

आचार संहितेच्या जोखडातून शिवजयंतीला मुक्त करा

मराठा समाजाची निवडणुक आयोगाला विनंती   प्रत्येक जिह्यातून देणार निवेदन

नाशिक, दि. 15 - महाराष्ट्रातील जिल्हापरिषद , पं.समिती आणि 10 मनपा निवडणुकीची धामधुम सुरू असतांना 19 फेब्रूवारी रोजी होणार्‍या शिवजयंतीवर आचार  संहितेचे सावट पसरल्याने जाणता राजाच्या जन्मोत्सवाच्या उत्साहावर विरजण पडण्याची भिती व्यक्त होऊ लागल्याने अस्मितेचा जन्मोत्सव आचार संहितेच्या  जोखडातून मुक्त करावा अशी भावना अखिल बहुजन समाजात व्यक्त होत आहे .बहुजन समाजाच्या मनात असलेली ही खदखद निवडणुक आयोगाच्या निदर्शनास आणून देण्याची भुमिका बहुजन समाजाचा मोठा भाऊ या नात्याने सकल मराठा समाज बजावणार आहे. या संदर्भात नाशिकमधील सर्व मराठा संघटना आणि सर्व राजकीय पक्षांच्या मंडळीं प्रातिनिधीक स्वरूपात वरद लक्ष्मी लान्सवर बैठक आयोजित केली होती. या बैठकीत काही मंडळींनी अठरा पगड बारा बलूतेदार बहूजन समाजाची अस्मिता असलेल्या जाणता राजा छञपती शिवाजी महाराज यांची 19 फेब्रूवारी रोजी साजरी होणारी जयंती आचार संहितेच्या कचाट्यात अडकावी या कुटील हेतूनेच निवडणुक आयोगाला निवडणुक कार्यक्रम जाहीर करण्यास भाग पाडले.या मागे बहूजन समाजाचे खच्चीकरण करून महापुरूषांचे महत्व कमी करण्यासाठी जयंती तारखेचा खेळ करणारी मानसिकता कार्यरत असल्याचा बहूजनांना असलेल्या संशयावर शिक्कामोर्तब करण्यात आले.निवडणुक कार्यक्रमाला विरोध नाही पण आमची अस्मिता जाणता राजा छञपती शिवाजी महाराज यांचा जयंती उत्सव  आचार संहितेतून मुक्त ठेवा ही भावना अखिल बहूजन समाजाची आहे.या भावनेचा निवडणूक आयोगाने आदर करावा.आणि आचार संहितेतून सुट द्यावी अशी मागणी बहूजन समाजाच्या वतीने मराठा समाज निवडणूक आयोगाकडे करणार आहे.
निवडणुक आयोगाने या भावनांचा चा आदर केला नाही तरी देखील बहूजन समाज आपल्या राजाविषयी आदर व्यक्त करण्यासाठी जन्मोत्सव साजरा करील. छञपतींचा भगवा अभिमानाने फडकेल.असा इशाराही या बैठकीने दिला. प्रत्येक जिल्ह्यातून याविषयीचे निवेदन जिल्हाधिकार्‍यांना देण्याचाही निर्णय या बैठकीत झाला.