माजी सरपंच संदीप मच्छिंद्र वराळ यांच्या खुनाच्या निषेधार्थ निघोजमध्ये तणावपुर्ण शांतता
। पूर्व वैमनस्यातून हल्ला झाल्याचा पोलिसांचा संशय
अहमदनगर, दि. 23 - काँग्रेसचे व माजी सरपंच संदीप मच्छिंद्र वराळ यांच्या खुनाच्या निषेधार्थ निघोज गाव दोन दिवस बंद व तणावपूर्ण शांततेचे वातावरण आहे.शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास निघोज येथे अज्ञात हल्लेखोरांनी निर्घृण हत्या केली. या हल्लयात दहा ते बारा हल्लेखोरांचा समावेश असल्याची माहिती समोर येत आहे. बाजारपेठेत हत्या झाल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. हल्लेखोरांनी तलवार व पिस्तुलाचा वापर केल्याने निघोज परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार- संदीप वराळ हे आज़ दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास दाढी करण्यासाठी निघोज़ येथील एका सलूनच्या आले होते. वराळ हे दाढी करीत असनाचा मोटारसायकलवर आलेल्या पाच ते सहा हल्लेखोरांनी वराळ यांना दुकानातून बाहेर ओढले व त्यांच्यावर पिस्तुलातून गोळया झाडल्या. पूर्व वैमनस्यातून हल्ला झाल्याचा पोलिसांचा संशय असल्याने पाच संशयित पोलिसांनी ताब्यात घेतले असून सदर खुनी हल्ल्याची कसून चौकशी चालू असून पुढील तपास जिल्हा अधीक्षक सौरभ त्रिपाठी, जिल्हा उपअधीक्षक आनंद भोईटे यांच्या मार्गदर्शनाखाली पारनेरचे पोलीस निरीक्षक दिलीप पारेकर, सहाय्यक सचिन जाधव व पोलीस पथक करीत आहे. घटनास्थळी उप अधीक्षक एस. पी. घनशाम पाटील यांनी प्रत्यक्ष पाहणी करून तपासाची चक्रे फिरवले असून पोलीस जिल्हा अधीक्षक सौरभ त्रिपाठी यांनी तातडीने गुन्हेगारांचा शोध लावण्याचे आश्वासन दिले आहे.
