कटक सामन्यासाठी इंग्लंडचा कर्णधार मॉर्गनला दंड
कटक, दि.21 :. निर्धारित वेळेत इंग्लंडने एक षटक कमी टाकल्यामुळे ही कारवाई झाली. त्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या कलम 2.5.1अंतर्गत संघाला सामन्याच्या मानधनातील 10 टक्के आणि कर्णधाराला त्या दंडाच्या रकमेच्या दुप्पट दंड ठोठवण्यात आला.
येथे भारताविरूद्ध झालेल्या दुसर्या सामन्यात षटकांची गती कमी राखल्याने इंग्लंडचा कर्णधार ऑईन मॉर्गन आणि संघाला दंड ठोठवण्यात आला आहे. पंचांच्या एलिट समितीचे सदस्य आणि सामन्याचे सामनाधिकारी अँडी पायक्रॉफ्ट यांनी ही दंडात्मक कारवाई केली
