Breaking News

डॉ. आहेर अभियांत्रिकी महाविद्यालयाने ’क्रीडा संस्कृती’ राबविली : डॉ. शिंदे

कराड, दि. 13 (प्रतिनिधी) : डॉ. अशोक गुजर टेक्निकल इन्स्टिट्युटस् डॉ. दौलतराव आहेर अभियांत्रिकी महाविद्यालयाने व शिवाजी विद्यापीठ पुरस्कृत एक  दिवशीय राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन महाविद्यालयात केले. या कार्यशाळेत जो विषय प्रामुख्याने घेण्यात आला आहे, त्या विषयाचे नांव ’क्रीडा संस्कृतीचे  महत्व’ हे योग्य असे नांव  ठेवले आहे. क्रीडा संस्कृतीचा गाभा हा संयम आहे. संयम नसेल तर, त्याचा परिणाम हा यशावर होत असतो. या कार्यशाळेच्या  माध्यमातून एक अतिशय चांगला संदेश दिला गेला आहे. व्यावसायिक महाविद्यालयाने कार्यशाळेचे आयोजन करत जवळपास 100 महाविद्यालयातील क्रीडा  संचालकांना एकत्र करून क्रीडा संस्कृती राबविली, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी केले.
याप्रसंगी संस्थापक अध्यक्ष डॉ. अशोकराव गुजर, सचिव डॉ. सौ. माधुरी गुजर, शिवाजी विद्यापीठ क्रीडा विभाग प्रमुख प्रा. पी. टी. गायकवाड, सुशिलादेवी देशमुख  कन्या महाविद्यालय लातूरचे डॉ. पी. एन. देशमुख, कार्यशाळेचे व्याख्याते खडकेश्‍वर औरंगाबाद शारिरीक शिक्षण महाविद्यालयाचे निवृत्त क्रीडा संचालक प्रा. एस.  जी. वनवे, लक्ष्मीबाई नॅशनल कॉलेज ऑफ फिजीकल एज्युकेशन त्रिवेद्रमचे डॉ. महेंद्र सावंत व कृष्णा कॉलेज ऑफ फिजीओथेरपीचे प्राचार्य डॉ. जी. वरदराजुलु,  विद्यापीठ बोर्ड ऑफ स्पोर्टस्चे सदस्य प्रा. शांताराम माळी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जालिंदर पाटील, उपप्राचार्य प्रा. हणमंत कुंभार व कार्यशाळा आयोजन  समितीचे सचिव प्रा.अयुब कच्छी यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी डॉ. पी. एन. देशमुख , प्रा. पी. टी. गायकवाड यांनी मार्गदर्शन केले. डॉ. अशोकराव गुजर यांनी मान्यवरांचे स्वागत करत, विद्यापीठाने या कार्यशाळेच्या  आयोजनाची संधी दिली याबद्दल धन्यवाद दिले. प्रारंभी, विद्यापीठाचे निवृत्त क्रीडा विभागप्रमुख दिवंगत प्रा.पांडुरंग म्हसकर यांना श्रध्दांजली वाहण्यात आली.  मान्यवरांचे डॉ. अशोकराव गुजर, प्राचार्य डॉ. जालिदर पाटील, उपप्राचार्य प्रा. हणमंत कुंभार, प्रा. अयुब कच्छी व आयोजन समिती सह-सचिव प्रा. विशाल गंधे  यांच्या हस्ते स्वागत व सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. जालिदर पाटील यांनी केले. पाहुण्यांचा परिचय प्रा. अयुब कच्छी यांनी करून दिला. प्रा.  विशाल गंधे यांनी आभार मानले. सुत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी अबुबकर सुतार व प्रा. बी. बी. कश्यप यांनी केले. कार्यशाळेसाठी राज्यातील क्रीडासंचालक,  महाविद्यालयाचे विभागप्रमुख, अधिष्ठाता, प्राध्यापकवृंद, कार्यशाळा आयोजन समितीचे खजिनदार, सदस्य, प्रबंधक, ग्रंथपाल, अधिक्षक, लेखापाल, शिक्षकेत्तर  कर्मचारी व विद्यार्थी-विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते.