युती तुटल्यानंतर शिवसेना-भाजप खासदार पहिल्यांदाच समोरासमोर!
मुंबई, दि. 27 - युती तुटल्यानंतर शिवसेना आणि भाजप खासदार आज पहिल्यांदाच समोरासमोर येणार आहेत. केंद्रीय अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी आढावा बैठक बोलावली आहे. या बैठकीला शिवसेना आणि भाजपचे खासदार उपस्थित राहणार आहेत.
सह्याद्री अतिथी गृहावर आज सकाळी 11 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात ही बैठक होणार आहे. केंद्राच्या अखत्यारित असलेले राज्यातील प्रकल्प तसंच अपूर्ण प्रकल्पांचा आढावा बैठकीत घेतला जाणार आहे.
दरम्यान, ‘राज्यातील सर्व महापालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणुका स्बळावर लढणार असल्याची घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल (गुरुवार) गोरेगावच्या पदाधिकारी मेळाव्यात हजारो शिवसैनिकांच्या उपस्थितीत केली. युतीचा काडीमोड झाल्यानंतर शिवसेना आणि भाजप खासदार पहिल्यांदाच आमनेसामने येणार आहेत. त्यामुळे युती तुटल्यावर शिवसेना खासदार मुख्यमंत्र्यांसमोर काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागलं आहे.