Breaking News

निवडणुकांची रणधुमाळी आजपासून, उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात

मुंबई, दि. 27 - राज्यातील निवडणुकांची खरी रणधुमाळी आजपासून सुरु होणार आहे. 10 महापालिका, 15 जिल्हा परिषद आणि 165 पंचायत समित्यांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. 3 फेब्रुवारीपर्यंत अर्ज दाखल करता येणार असून 4 फेब्रुवारीला अर्जांची छाननी होणार आहे. सात फेब्रुवारीला अर्ज माघारी घेण्याची शेवटची मुदत असेल.
राज्यातल्या 10 महापालिकांसाठी 21 फेब्रुवारीला मतदान होणार असून 23 फेब्रुवारीला निकाल जाहीर होईल. तर 25 जिल्हा परिषदांसाठी दोन टप्प्यात मतदान  होणार आहे. 16 फेब्रुवारीला मतदानाचा पहिला टप्पा पार पडणार असून यात 15 जिल्ह्यांचा समावेश असेल. दुसर्‍या टप्प्यासाठी 21 फेब्रुवारीला मतदान होणार  असून महापालिकांसोबतच जिल्हा परिषदांचा निकाल 23 फेब्रुवारीलाच जाहीर होणार आहे.