Breaking News

पथसंचलनातून मुलांमध्ये शिस्तीचे संस्कार घडतात -आ.हेमंत पाटील

नांदेड, दि. 29 -गोदावरी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा   पथसंचलनातून मुलांमध्ये शिस्तीचे संस्कार घडतात तसेच राष्ट्र उभारणीसाठी विध्यार्थी व शिक्षक फार मोलाची जबाबदारी पार पडत असतात त्यामुळे प्रत्येक शाळेमध्ये सर्वगुणसंपन्न व अष्टपैलू व्यक्तिमत्वाचे विध्यार्थी राष्ट्रहितासाठी घडले पाहिजेत असे प्रतिपादन शिवसेना आमदार हेमंत पाटील यांनी गोदावरी इंटरनॅशनल इंटरनॅशनल पब्लिक स्कूलच्या ध्वजारोहण प्रसंगी केले.
यावेळी आमदार हेमंत पाटील, संस्थेच्या अध्यक्षा राजश्री पाटील, सचिव रवींद्र रगटे, गोदावरी अर्बनचे व्यवस्थापकीय संचालक धनंजय तांबेकर, संचालिका किर्ती तगडपल्लेवार, अजय सरसमकर, सदाशिव पुंड, संचालक प्रसाद महल्ले, माजी विरोधी पक्ष नेता बालाजी कल्याणकर, जयवंत कदम, साहेबराव मामिलवाड, सुरेखा दवे यांची उपस्थिती होती. पुढे बोलताना आमदार पाटील म्हणाले कि विध्यार्थी व शिक्षक हे एकाच रथाची दोन चाके आहेत त्यातले एकजरी चाक ढासळले तर रथ चालत नाही तेव्हा विध्यार्थ्यानी विध्यार्थी दशेतच यशाची शिखरे सर केली पाहिजे असे सांगितले याप्रसंगी संस्थेच्या अध्यक्षा राजश्री पाटील बोलताना म्हणाल्या कि शिक्षण घेत असताना विध्यार्थ्यानी व्यावहारिक असले पाहिजे याकरिता गोदावरी स्कुल चिल्ड्रन मिनी बँक सुरुवात केली आहे मुले व मुली या बँकेत पासबुक घेऊन पैसे जमा करतात यामुळे मुलांना व्यावहारिक ज्ञानाचे संस्कार बालवयातच रुजतात तसेक ग्रामीण भागातील विध्यार्थी हा आजच्या स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी त्यांची योग्य ती तयारी आपण करून घेणार आहोत असे सांगितले याप्रसंगी विध्यार्थ्यानी रेखाटलेल्या देशभक्ती आणि सामाजिक आशय असलेल्या भित्तीपत्रकाचे तसेच विध्यार्थ्यानी विविध प्रसंगी काढलेल्या चित्रांच्या माध्यमातून तयार केलेल्या दिनदर्शिकेचे अनावरण मा.आमदार हेमंत पाटील व सर्व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी विध्यार्थ्यानी नेत्रदीपक पथसंचलन, कावयतीचे विविध प्रकार सादर करून सर्व उपस्थितांची मने जिंकली त्यानंतर कुस्ती व व्हॉलीबॉल सामन्याचे ढोल-ताश्याच्या गजरात आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक गोदावरी पब्लिक स्कूलचे उपमुख्याध्यापक तारीख अहेमद यांनी केले तसेक सूत्रसंचलन प्रा.रमेश वानखेडे व प्रा.प्रवीण पतंगे तर आभार प्रदर्शन प्रा.नितीन हटकर यांनी केले. सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी क्रीडा शिक्षक सुहास कांबळे व सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.