वाद्यांचा आवाज तोंडाने काढून राष्ट्रगीत, ऋषभ गोखलेची कला
मुंबई, दि. 27 - मुंबईतील ऋषभ गोखले या तरुणाने अनोखी कला जोपासली आहे. अॅकापेला असं या कलेचं नाव. वाद्यांचा आवाज तोंडाने काढून गाणं गाण्याची ही कला. ‘जन गण मन’ आणि ‘वन्दे मातरम्’ ही दोन गीतं ऋषभने आपल्या अनोख्या कलेतून गायली आहेत.
ट्रम्पेट, ट्रोम्बोन, बॅन्जो, ड्रम्स, व्होकल कॉयर, बेस गिटार यांचा आवाज तोंडाने काढून ‘द बेअर नेसेसिटीज’ गाणं सादर करणार्या ऋषभच्या या कलेचं प्रचंड कौतुक होत आहे. या आधीही ऋषभने अशाचप्रकारे अनेक गाणी आपल्या अॅकापेला या कलेतून साकारली आहेत. या संकल्पनेतून ऋषभने भारताचं राष्ट्रगीतही सादर केलं आहे.
याआधी 1967 साली प्रदर्शित झालेल्या ‘द जंगल बुक’ या अॅनिमेटेड सिनेमातील ‘द बेअर नेसेसिटीज’ गाणं आपल्या अनोख्या कलेतून ऋषभने गायलं होतं. सोलो अॅकापेलाचा प्रयोग देशात प्रथमच झाला असल्याचं ऋषभ सांगतो. याआधी दोघांनी मिळून किंवा ग्रुप अॅकापेलाचे प्रयोग देशात झाले आहेत. ऋषभला लहाणपणापासूनच बिटबॉक्सिंग किंवा वेगवेगळ्या वाद्यांचे आवाज तोंडाने काढण्याची सवय होती. ड्रम्सचा आवाज सहजपणे तोंडाने काढत असे. उपजत आलेल्या या कलेला योग्य मार्ग देण्याचं ऋषभने ठरवलं आणि त्यातूनच ‘अॅकापेला’ ही संकल्पना सत्यात उतरली.