भाजपा कार्यकर्त्यांचा मेळावा व जाहीर सभा
चिखली, दि. 20 - आगामी जिल्हा परिषद व पांयत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर भारतीय जनता पार्टी तर्फे उद्या शुक्रवार दिनांक 20 जानेवारी रोजी भव्य कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी चिखली नगर पालिकेमध्ये जनतेने भाजपाला एकहाती सत्ता दिली व भाजपावर जो विश्वास दाखविला त्याबद्दल जनतेचा आभार सोहळा देखील आयोजीत करण्यात आला आहे.
शुक्रवारी सकाळी 11 वाजता स्थानीक राजाटॉवर येथे आयोजीत या कार्यक्रमासाठी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष मा.खा.रावसाहेब दानवे पाटील यांच्यासह जिल्ह्याचे पालकमंत्री तथा कृषीमंत्री मा.ना.भाऊसाहेब फुंडकर, महिला व बालविकास मंत्री मा.ना.पंकजाताई मुंढे, रोजगार हमी योजना व पर्यटन मंत्री जयकुमार रावल, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष मा.आ.चैनसुख संचेती, प्रदेश सरचिटणीस आ.डॉ.संजय कुटे, खामगांवचे आ.अॅड.आकाश फुंडकर, जिल्हाध्यक्ष धृपतराव सावळे, आदि मान्यवर उपस्थित राहणार आहे.
यावेळी नवनिर्वाचीत नगराध्यक्षा सौ.प्रिया कुणाल बोंद्रे यांच्यासह सर्व नगरसेवकांच्या वतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात येणार आहे. त्याचबरोबर जाहीर सभेचे देखील आयोजन करण्यात आले असून वरील कार्यक्रमांना जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन तालुका व शहर भाजपाच्या वतीने करण्यात आले आहे.