जम्मू काश्मीरमध्ये हिमस्खलन, एका जवानासह चार स्थानिकांचा मृत्यू
श्रीनगर, दि. 25 - जम्मू काश्मीरच्या सोनमर्गमध्ये झालेल्या हिमस्खलनाबाबत नवी माहिती हाती येत आहे. हिमस्खलनात मृत्यू झालेल्या पाच जणांमध्ये एका लष्करी अधिकार्यासह चार स्थानिकांचा समावेश आहे. सोनमर्गमधील आर्मी कॅम्पजवळ हे हिमस्खलन झाल्याचं सांगण्यात येत होतं, दुसरीकडे काश्मीरमधील नियंत्रण रेषेजवळ गुरेज सेक्टरमध्येही हिमस्खलन झालं. इथे एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे.
या परिसरात गेल्या काही दिवसांपासून तुफान बर्फवृष्टी सुरु आहे. सोनमर्गच्या या भागात नेहमीच हिमस्खलन होत असतं. सोनमर्गमध्ये होणार्या हिमस्खलनाचा फटका अनेकदा भारतीय सैन्याला बसला आहे. आर्मी कॅम्पवरील हिमस्खलनामुळे अनेकजण बर्फाखाली दबल्याचा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र बर्फाखाली दबलेल्या 8 जवानांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलं आहे. जम्मू काश्मीर आणि हिमाचल प्रदेशमध्ये या मोसमातील ही चौथी हिमवृष्टी आहे. काश्मीरमध्ये कालपासून सुरु झालेल्या हिमवृष्टीमुळे प्रशासनानं उंच ठिकाणी राहणार्या रहिवाशांना हिमस्खलनाचा इशारा दिला होता.