Breaking News

बछड्यांबरोबरच्या छायाचित्रांमुळे औरंगाबादचे महापौर अडचणीत येणार?

औरंगाबाद, दि. 13 - औरंगाबादचे महापौर भगवान घडामोडे यांनी वाघाच्या बछड्यांबरोबर छायाचित्रे काढली असून त्यामुळे ते अडचणीत  सापडण्याची शक्यता आहे. सिद्धार्थ प्राणीसंग्रहालयात समृद्धी वाघिणीला चार पिल्ले झाली. त्यातील तिघांच्या नामकरण कार्यक्रमादरम्यान महापौरांनी ही छायाचित्रे  काढली. अशा प्रकारे छायाचित्रे काढणे नियमबाह्य असल्याने याप्रकरणी महापौरांविरोधात कारवाई होण्याची शक्यता आहे.
या वाघिणीचे एक पिल्लू जन्मानंतर लगेचच दगावल्याने उरेलल्या तिघांची विशेष काळजी घेतली जात आहे.