लोढा समिती शिफारशी: सुप्रीम कोर्टाचा आज अंतिम आदेश येण्याची शक्यता
मुंबई, दि. 02 - जस्टिस लोढा समितीनं बीसीसीआयला केलेल्या शिफारशींप्रकरणी सर्वोच्च न्यायालय आज अंतिम आदेश देण्याची शक्यता आहे. भारताचे सरन्यायाधीश टी. एस ठाकूर यांच्या खंडपीठासमोर आज या प्रकरणी सुनावणी होणार असून, बीसीसीआयचे अध्यक्ष अनुराग ठाकूर यांना कारवाईला सामोरं जावं लागू शकतं.
अनुराग ठाकूर यांनी सर्वोच्च न्यायालयात खोटी साक्ष दिल्याचं सिद्ध झाल्यास त्यांना तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. तसंच बीसीसीआयच्या विद्यमान पदाधिकार्यांची हकालपट्टी करून भारतीय क्रिकेटचा कारभार अन्य कुणा सक्षम अधिकार्याच्या हातात द्यायचा निर्णय सर्वोच्च न्यायालय घेणार का, हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल.
बीसीसीआय अध्यक्षांनी वारंवार दिशाभूल केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं त्यांना पंधरा डिसेंबरला झालेल्या सुनावणीत चांगलंच फटकारलं होतं. लोढा समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी हा बीसीसीआयच्या कारभारातला सरकारी हस्तक्षेप ठरतो. असं आयसीसीनं बीसीसीआयला पत्रानं कळवावं अशी विनंती ठाकूर यांनी आयसीसी अध्यक्ष शशांक मनोहर यांना केली होती. अनुराग ठाकूर यांनी सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात आपण अशी विनंती केल्याचं नाकारलं होतं. मात्र, आयसीसी अध्यक्ष शशांक मनोहर यांनी लोढा समितीला लिहिलेल्या पत्रामुळं ठाकूर यांनी अशी विनंती केल्याचं स्पष्ट झालं होतं.