राजकारणाचे डोही निष्ठेच्या चैतन्याचे तरंग
दि. 19, जानेवारी - जिल्हा परिषद, पं.समिती आणि दहा महापालिकांच्या निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांमध्ये विशेषतः कार्यकर्त्यांमध्ये असलेली मरगळ दुर झाल्याचे दिसते आहे.विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर भाजप आणि शिवसेना पक्षाचे नेते कार्यकर्त्यांचा उत्साह द्विगुणीत झाला त्याच वेळी राष्ट्रीय आणि राष्ट्रवादी काँग्रेससह महाराष्ट्र नवनिर्माण सेना अन्य युततीच्या प्रवाहाबाहेरील पक्षाच्या कार्यकर्त्यांचा भलताच हिरमोड झाला होता.ही परिस्थिती फार काळ माञ टिकली नाही.सरकारमधील मिञ पक्षांमधील उणीदूणी,विशिष्ट मंञ्यांचे निवडक घोटाळे या बाबी महाराष्ट्रातील नैराश्याच्या कोशात गेलेल्या विरोधी पक्षाच्या नेत्यांमध्ये संजीवनी फुंकण्यास कारणीभुत ठरल्या.सरकारमधील भानगडी चव्हाट्यावर मांडतांना विरोधी आक्रमक होऊ लागले आणि सत्तांतरानंतर महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय चैतन्य खेळतांना दिसू लागले.
माञ हे चिञ केवळ नेते पातळीवरच दिसत होते.या चैतन्य लहरी कार्यकर्त्यांपर्यंत पोहचल्या नाहीत किंबहूना बेस केडर कार्यकर्त्यांपर्यंत लहरी पोहचविण्यात नेतृत्वाला अपयश आले.परिणाम समोर आहे,कोलीत हातात मिळूनही सरकार विरोधी मतांची आग लावण्यास विरोधक यशस्वी झाले नाहीत.दोन वर्षाच्या काळात झालेल्या नगर पंचायत,नगर परिषद निवडणुकांच्या निकालातून स्पष्ट झाले.
आता जिल्हा परिषद आणि महापालिकांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाल्यानंतर माञ परिस्थिती पुर्वीपेक्षा वेगळी दिसते आहे.दोन वर्षात भाजप सेना युतीचे नेते आणि कार्यकर्ते उत्साहात होतेच त्यात आणखी प्रगती झाली तर दुसर्या बाजूला विरोधी नेत्यांसोबत कार्यकर्तेही जोम दाखवू लागले आहेत.निवडणुका आल्या की प्रथेप्रमाणे कार्यकर्त्यांमध्ये जोर संचारतोच.कुणी नाना बाबा दादा भाऊसाठी तर कुणी स्व ऊमेदवारीसाठी कामाला लागतो.हेच चिञ महाराष्ट्रात सर्वदूर सर्वच राजकीय पक्षात एकजात दिसू लागल्याने राजकीय चैतन्य ओसंडून वाहू लागले आहे.
उमेदवारांची अंतिम यादी जाहीर होई पर्यंत हे चैतन्य दिवसागणिक वृध्दींगतच होणार यात शंका नाही. एकदा का सर्व राजकीय पक्षांनी आपले ऊमेदवार जाहीर करून प्रचाराला प्रारंभ गेला की मग उरलेले सारेच निष्ठावानआपली निष्ठा तपासून घासून पहातांना सुबह का भुला शाम को घर या जातकुळीत स्वतःला कोंडून घेतांना दिसतील.निष्ठावंताच्या व्याख्येतील राजकारणाच्या डोहात सध्या उठलेले चैतन्याचे तरंग माञ भलतेच उत्साहवर्धक आहेत हे नक्की.