Breaking News

कोल्हापूरच्या माजी महापौर अश्‍विनी रामाणेंचं नगरसेवक पद रद्द

कोल्हापूर, दि. 28 - कोल्हापूरच्या माजी महापौर आणि काँग्रेसच्या नगरसेविका अश्‍विनी रामाणे यांचं नगरसेवक पद आज रद्द करण्यात आलं आहे. जातपडताळणी समितीनं त्यांचा जातीचा दाखला अवैध ठरवल्यानं त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली.
जात पडताळीत त्यांचा जातीचा दाखला अवैध ठरल्यानं कोल्हापूर पालिकेच्या आयुक्तांनी नगरसेवक पद रद्द करण्याची कारवाई केली. अश्‍विनी रामाणे यांचं नगरसेवक पद रद झाल्यानं काँग्रेसला कोल्हापूरमध्ये मोठा धक्का बसला आहे. महापौरपदाच्या निवडणुकीत अश्‍विनी रामाणे यांनी बाजी मारली होती. त्यांनी भाजपच्या सविता भालकरांचा पराभव केला होता. मात्र, आता जातीचा दाखला अवैध ठरविल्यानंतर रामाणे यांचं नगरसेवक पदच रद्द झालं आहे