सज्जनगडावर दासनवमीनिमित्त विविध कार्यक्रम
सातारा, दि. 20 - श्री समर्थ रामदास स्वामींच्या वास्तव्याने पुनित झालेल्या सज्जनगडावर 11 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारी 2017 या कालावधीत दासनवमी महोत्सवात किर्तने, प्रवचन व गायन आदी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
महोत्सव काळामध्ये होणारे विशेष कार्यक्रम पुढीलप्रमाणे, 11 फेब्रुवारी ते 19 फेब्रुवारी 2017 दरम्यान रोज सकाळी 8 ते 11 या वेळेत नितीनबुवा रामदासी व सौ. रसिकाताई ताम्हणकर यांचे मार्गदर्शंनाखाली दासबोध वाचन, दि. 11 व 12 रोजी सकाळी 11 ते 12 या वेळेत सुनिल चिंचोळकर व दि. 13 फेब्रुवारी ते 17 फेब्रुवारी पर्यत ह. भ. प. गुरुनाथ महाराज कोटणीस यांची प्रवचने होणार आहेत.
दि. 18 व दि. 19 रोजी मंदाताई गंधे यांचे प्रवचन, दुपारी 4 ते सायंकाळी 6.30 पर्यत दररोेज दासनवमी अखेर मकरंद बुवा रामदासी यांचे किर्तन, 11 रोजी दिपक क्षीरसागर व प्रचला अमोणकर यांचे गायन, 12 रोजी व अनुजा झोकरकर यांचे गायन, 13 रोजी पं. रघुनंदन पणशीकर यांचे गायन, 14 रोजी अमृता फडके व राजस जोशी यांचे गायन, 15 रोजी पं. व्यंकटेश कुमार यांचे गायन, 16 रोजी शौनक अभिषेकी यांचे गायन, 17 रोजी प्रमोदिनीराव यांचे गायन, 18 रोजी पं. परमेश्वर हेगडे यांचे गायन, पं. विजय घाटे यांचे सोलो तबला वादन होउन सौ. मंजुषा पाटील यांचे गायन, दासनवमी महोत्सवाची सांगता सोमवार, दि. 20 फेब्रुवारी रोजी दासबोध वाचन, कीर्तन व महाप्रसादाने होणार आहे. या सर्व कार्यक्रम समर्थ भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन सज्जनगडावरील दोन्ही संस्थाच्या विश्वस्थांनी केले आहे.