Breaking News

संजय निरुपम मूर्ख माणूस : शरद पवार

कोल्हापूर, दि. 28 -  मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम हा मूर्ख माणूस आहे, असा घणाघात, काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. ते कोल्हापुरात बोलत होते. संजय निरुपम हा मूर्ख माणूस, त्यांनी महाराष्ट्रासाठी काय काम केले? केवळ पद आहे म्हणून त्यांचे नाव आहे. पद गेल्यावर कोण विचारतंय असं पवार म्हणाले. मुंबईत राष्ट्रवादीसोबत युती करण्यास संजय निरुपम यांनी ठाम नकार दिला. त्या पार्श्‍वभूमीवर पवारांनी निरुपम यांच्यावर हल्ला चढवला. स्थानिक पातळीवर  काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी झाली तर आनंद होईल, असंही पवार यांनी नमूद केलं. राष्ट्रवादीत राहून भाजपासोबत जाणार्‍या नेत्यांना शरद पवारांनी खडसावले. माजी खासदार निवेदिता माने आणि अशोक जांभळे यांना पवारांनी कानपिचक्या दिल्या. तसंच भाजप किंवा शिवसेना कोणालाही पाठिंबा देणार नसल्याचं यावेळी पवार म्हणाले.
कोल्हापूर जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादीतील नेत्यांची मुले भाजपच्या सोबत जात असल्याने शरद पवार यांनी आपल्या कोल्हापूर दौर्‍यात  आज सकाळी हॉटेल पंचशील इथं नेत्यांचा खरपूस समाचार घेतला. यामध्ये माजी खासदार निवेदिता माने यांचा मुलगा जिल्हा परिषद सदस्य धैर्यशील माने हे  भाजप सोबत तर माजी आमदार अशोक जांभळे हे नुकत्याच झालेल्या इचलकरंजी नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपसोबत गेले होते,त्यामुळे निवेदिता माने  आणि अशोक जांभळे याना सोबत घेऊन पवारांनी कानपिचक्या दिल्या. त्यामुळं राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.