कुमार वाकळेंचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा
अहमदनगर, दि. 01 - अनाथ, मूकबधिर व मतिमंद विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सामाजिक संस्थांनी पुढे येऊन त्यांना मदत करणो गरजेचे आहे. त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी त्यांना सर्व जीवनावश्यक वस्तू देणो हे आपले कर्तव्य आहे. त्याचाच एक भाग म्हणून कुमार वाकळे यांनी 6 महिन्यांसाठी लागणारे अन्नधान्य मूकबधिर विद्यालयास दिले आहे. मूकबधिर व मतिमंद मुलांना सामान्यांप्रमाणो जीवन जगता यावे, यासाठी ही संस्था काम करीत असून, या मुलांना घडवित आहे, असे प्रतिपादन आ. संग्राम जगताप यांनी केले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष कुमार वाकळे यांच्या वाढदिवसानिमित्त सावेडीतील मूकबधिर विद्यालयास किराणा माल व नित्योपयोगी वस्तु देण्यात आल्या. यावेळी आ.जगताप बोलत होते. यावेळी नगरसेवक स्वप्नील शिंदे, निखील वारे, बाळासाहेब पवार, अभिषेक कळमकर, अभिजीत खोसे, मनोज कोतकर, प्रवीण बारस्कर, बजरंग भोर, रमेश वाकळे, सचिन गांगर्डे, संजय खामकर, आकाश वायकर, सोमनाथ कराळे, सनी वाकळे आदी उपस्थित होते.